|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » विविधा » यांच्याकडे आहेत तब्बल 7 हजार महागडय़ा कार

यांच्याकडे आहेत तब्बल 7 हजार महागडय़ा कार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लग्झरी कार म्हटल की आपल्या समोर बीएमडब्ल्यू, ओडी, डीसी अवंती यांसारख्या महागडय़ा कार डोळय़ा समोर येत असतील पण 1980 पासून जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱया बुनेईचे सुलतान हसनल यांच्याकडे पुर्णपणे सोन्याने मढवलेली 95 कोटी किमतीची लिमोसीन कार आहे. इतकेच नाहीतर तब्बल 7 हजार महागडय़ा कार्स आहेत व सोन्याने मढविलेले विमानही आहेत.

1993 साली या सुल्तनाचे नाव गिनिज बुकमध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नोंदविले गेले आहे. अनेक तेल खाणी त्याच्या मालकीच्या आहेत. त्याला बेंटलीच्या महागडय़ा कार्स फार आवडतात कार देण्यासाठी पाच विमाने बसतील इतक्या मोठय़ा गॅरेजची सोय केली गेली आहे व त्यात 7 हजार कार पार्क केलेल्या आहेत. या कार्सची किमंत 5 ऍब्ज डॉलर्स आहे. यात 600 मर्सिडीज , 20 लोम्बार्गिनी, 600 रोल्स रॉईस, 452 फेरारी, 170 जग्वार, 209 बीएमडब्ल्यू, 382 बेंटली, 574 मर्सिडीज बेंझ व सोन्याने मढविलेले बोईंग विमान यांचा समावेश आहे. या सुल्तानचा महालही अलिशान असून त्यात 1688 खोल्या आहेत. महालाचे सिलींग सोन्याचे आहे. हे जगातील सर्वात महागडे घर मानले जाते.

Related posts: