|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » काश्मीरमध्ये दहशतवाद्याला पकडले

काश्मीरमध्ये दहशतवाद्याला पकडले 

दोन पिस्तुल व हँण्डग्रेनड जप्त,

वृत्तसंस्था/ श्रीनगर

स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ामध्ये एका दहशतवाद्याला पकडण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली. त्याच्याकडून दोन पिस्तुलं आणि दोन हँण्डग्रेनेड जप्त केले आहेत. मंजूर अहमद असेत्याचे नाव असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नौपारा येथील लस्सीपोरा खेडय़ामध्ये पोलीस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. दहशतवादी लस्सीपोरा येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण गावाला वेढा घालण्यात आला. त्यामध्ये या स्थानिक दहशतवाद्याला पकडण्यात आले. त्याच्याजवळ पिस्तुल आणि 2 हँण्डग्रेनेड आढळून आल्याचे सांगण्यात आले.

Related posts: