|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूंची याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूंची याचिका फेटाळली 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने आसरामबापूंची याचिका शुक्रवारी फेटाळली. त्यांच्या मागणीप्रमाणे गुजरात व राजस्थानप्रकरणाची सुनवाणी रोज होऊ शकत नाही. प्रथम राजस्थानची सुनवाणी होईल त्यानंतर गुजरातची सुनावणी होईल, असे स्पष्ट न्यायालयाने स्पष्ट केले.

 अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी तीन वर्षांहून अधिककाळ आसाराम बापू जेलमध्ये आहेत. त्यांनी तक्रार केली होती की, गुजरातप्रकरणी मुख्य साक्षीदारांचे साक्ष घेतली गेली नसून लवकरात लवकर त्या घेण्यात याव्यात. यावर गुजरात सरकारने न्यायालयात सांगितले की, आसाराम यांना गुजरातमध्ये नेण्यास समस्या असून त्यांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फ्रन्सद्वारे होत आहे. यामुळे सर्वोच न्यायालयाने आसाराम यांची याचिका फेटाळली. प्रथम राजस्थानची नंतर गुजरातची सुनावणी होईल, असे सांगण्यात आले. तसेच राजस्थानप्रकरणी न्यायालयाकडून नव्हे तर आसाराम यांच्या शिष्यांमुळे सुनावणी लांबत आहे, यास स्वत: आसाराम बापू जबाबदार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने अंतिरम जामीन याचिका व नियमित जमानत याचिका फेटाळली होती.

Related posts: