|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पॅरिसमध्ये हल्ला उधळला

पॅरिसमध्ये हल्ला उधळला 

लुवर कलासंग्रहालयावर चाकूहल्ला-गोळीबार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये लुवर कलासंग्रहालयाजवळ गस्तीवर असलेल्या सुरक्षा रक्षकावर एका तरुणाने चाकूहल्ला केल्याने खळबळ उडाली. सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात हल्लेखोर गंभीर जखमी झाला आहे. या घटनेवेळी हल्लेखोराने ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा दिल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. या चाकूहल्ला आणि गोळीबाराच्या घटनेमुळे भय बाळगण्याची आवश्यकता नाही, तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.

पॅरिसमध्ये सुप्रसिद्ध लुवर संग्रहालयाच्या परिसरात एक तरुण संशयास्पद स्थितीमध्ये फिरत होता. त्याने संग्रहालयामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षकाने त्याला रोखले. यानंतर त्या तरुणाने चाकू काढून जवानावर हल्ला केला. या हल्ल्यात जवान किरकोळ जखमी झाला. तर जवानाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने लुवर संग्रहालय आणि सभोवतालचा परिसर रिकामा करत चारही बाजूंनी वेढा घातला. तसेच सुरक्षाव्यवस्था सतर्क करण्यात आली. हल्लेखोराकडे सापडलेल्या दोन बॅगांची पोलिसांनी तपासणीही केली. मात्र त्यात स्फोटक पदार्थ सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पहिल्यांदा हा हल्ला दहशतवाद्यांकडून झाल्याचा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, चौकशीअंती तशी शक्यता सुरक्षा अधिकाऱयांनी फेटाळली.

लुवर संग्रहालय जगभरात प्रसिद्ध

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील लुवर संग्रहालय हे पर्यटकांमध्ये सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. या संग्रहालयात जगभरातील सर्वात महागडय़ा चित्रांचा संग्रह आहे. मनोहारी कलासंग्रहालय पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. गेल्या दोन वर्षात इसिस या दहशतवादी संघटनांनी फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ले घडवल्याने देशातील सुरक्षेचा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे.

Related posts: