|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » विराट कट्टर प्रतिस्पर्धी, त्याला डिवचू नका!

विराट कट्टर प्रतिस्पर्धी, त्याला डिवचू नका! 

माजी फलंदाज माईक हसीचा विद्यमान ऑस्ट्रेलियन संघाला इशारा, भारत-ऑस्ट्रेलिया मालिका 23 फेब्रुवारीपासून

वृत्तसंस्था/ मेलबर्न

‘भारताविरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियासाठी विराट कोहली हाच मुख्य शत्रू असेल. पण, त्याला अजिबात डिवचू नका. स्लेजिंग तर अजिबात करु नका. कारण, तसे झाल्यास विराटचा सर्वोत्तम खेळच बाहेर येईल आणि ऑस्ट्रेलियाला ही बाब फटका देणारी ठरु शकते’, असा स्पष्ट इशारा माजी फलंदाज माईक हसीने दिला.

Mike-Hussey_0

‘विराटला आव्हाने झेलणे मनापासून आवडते. तो खरा जिद्दी खेळाडू आहे आणि सहजासहजी हार मानणे त्याच्या रक्तात नाही. या पार्श्वभूमीवर, त्याला शक्य तितक्या लवकर, स्वस्तात बाद करणेच योग्य ठरेल’, असे हसी पुढे म्हणाला. ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज फलंदाजाने 2013 मध्ये निवृत्त होण्यापूर्वी 6235 धावांचे योगदान दिले आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी मालिकेत कोणता संघ स्लेजिंग करतो, यावर यशापयश ठरणार नाही. उलटपक्षी, जो संघ आपली रणनीती चोखपणे, काटेकोर अंमलात आणेल, तोच यशस्वी ठरेल, याचाही त्याने उल्लेख केला.

विराट कोहली मागील काही वर्षांच्या कालावधीत भारतीय फलंदाजीत भक्कम आधारस्तंभ ठरत आला असून यापूर्वी 2014 मध्ये बॉक्ंिसग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने विराटला डिवचले, त्यावेळी त्यांना याची चांगलीच किंमत मोजावी लागली होती. विराटने त्या अनिर्णीत लढतीत कारकिर्दीतील सर्वोत्तम 169 धावांची खेळी साकारली होती. या मालिकेच्या निमित्ताने दोन्ही कर्णधारांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगेल, अशी चिन्हे आहेत. यापूर्वी देखील विराट व स्मिथ हे कर्णधार अनेकदा आमनेसामने भिडले असून त्यांच्यात काही वेळा शाब्दिक बाचाबाची देखील झडली आहे.

उभय संघातील मालिकेची रुपरेषा

लढत / तारीख / ठिकाण

पहिली कसोटी /दि. 23 ते 27 फेब्रुवारी/  पुणे

दुसरी कसोटी / दि. 4 ते 8 मार्च / बेंगळूर

तिसरी कसोटी / दि. 16 ते 20 मार्च / रांची

चौथी कसोटी / दि. 25 ते 29 मार्च / धर्मशाळा

 

Related posts: