|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » हिंजवडीत बांधकाम सुरु असताना क्रेन पडली ; एका कामगाराचा मृत्यू

हिंजवडीत बांधकाम सुरु असताना क्रेन पडली ; एका कामगाराचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / पुणे :

हिंजवडी येथे इमारतीचे बांधकाम चालू असताना इमारतीवरुन क्रेन पडली. या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर बांधकाम सुरु होते. तेव्हा ही दुर्घटना घडली. क्रेन पडल्याने येथे काम करणाऱया एका कामगाराचा मृत्यू झाला.

पुण्यातील हिंजवडी येथे एका इमारतीचे बांधकाम सुरु होते. या बांधकामादरम्यान क्रेन अचानकपणे खाली कोसळली. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून चार कामगार जखमी झाले. या जखमींपैकी एका कामगाराचा मृत्यू झाला. यामध्ये 23 वर्षीय रविंद्र प्रधान या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.