|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » बालविश्वातील स्थित्यंतरे बालसाहित्यात यावी

बालविश्वातील स्थित्यंतरे बालसाहित्यात यावी 

विशेष प्रतिनिधी / डोंबिवली साहित्य संमेलन

आज संख्यात्मक बालसाहित्य खूप आहे. नेमके आणि चांगले साहित्य  कमी झाले आहे. आजच्या बालपिढीवर टीव्ही आणि तंत्रज्ञानाचा खूप प्रभाव आहे. ते बालसाहित्यासाठी आव्हान आहे. त्यामुळे बालसाहित्यातून तंत्रज्ञान, संस्कार, बुद्धीचा विकास असा मेळ बालसाहित्यात येणे अपेक्षित आहे. आजच्या बालविश्वासातील बदलत्या स्थित्यंतरांचा समावेश बालसाहित्यामध्ये झाला पाहिजे तर बालसाहित्य वाचले जाईल, असा सूर बालकुमारांसाठीच्या लेखनाचे काय झाले? या परिसंवादातील मान्यवरांनी व्यक्त केला. या परिसंवादत बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड, सुरेश सावंत आणि नरेंद्र लांजेवार आदींचा सहभाग होता.

या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. न. म. जोशी म्हणाले की, मोठे साहित्य वर्तुळातले एक स्वतंत्र्य वर्तुळ म्हणजे बालसाहित्य होय. या वर्तुळातील फोकस पॉईंट ही मुले असून तर त्रिज्या, व्यास लेखक आहे. बालसाहित्यात मुलांना काय आवडते त्याचबरोबर त्यांना काय आवडेल असे लेखन झाले पाहिजे. मुलांचे भावजीवन आणि बौद्धिकजीवन घडवणे हे बालसाहित्यिकांचे कर्तव्य आहे. बालसाहित्यामध्ये

वैज्ञानिकतेचा समावेश असावा पण रुक्ष नसावा. बालसाहित्य गाजवले पाहिजे, असे मत जोशी यांनी व्यक्त केले. बालसाहित्य आणि बालशिक्षण एकाच नाण्याच्या बाजू आहेत. पण बालसाहित्य आणि बालशिक्षण हे दोन्ही विषय उपेक्षित राहिले, असे परखड मत बालसाहित्यिक सुरेश सावंत यांनी व्यक्त केले. आजचे बाल स्वयमप्रज्ञ आहे. त्याच्यासाठी उपदेशात्मक, राजा राणीच्या गोष्टी लिहून आता चालणार नाही. तर त्यांच्या आजच्या काळातील स्थित्यंतरे बालसाहित्यातून येणे आवश्यक आहे. तसेच आजची पिढी यंत्र आणि पशु होऊ देयची नसेल तर त्याच्या हाती उत्तम बालसाहित्य द्यायला पाहिजे, असे आवाहन सावंत यांनी केले.

मुलांचे नवे भावविश्व समजून घेणे बालसाहित्यातून कमी झाले आहे. तसेच मुलांच्या वयोगटानुसार, बालसाहित्य येणे अपेक्षित आहे. पण तसे होताना दिसत नाही, असे मत बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी व्यक्त केले. बालसाहित्यात नवे नवे प्रयोग करणे गरजेचे आहे. जे नवे प्रयोग करत आहे त्यांना प्रसारमाध्यमे आणि समीक्षकांना प्रसिद्धी दिली नाही, अशी खंत आव्हाड यांनी व्यक्त केली. नवता आणि परंपराचा मेळ घालून बालसाहित्य लिहिले पाहिजे. बालसाहित्य लिहिणारे लेखक मोजकेच आहेत. तर बालसाहित्य लिहिण्यासाठी आपले श्रेष्ठत्व विसरुन लेखकांनी पुढे यावे, असे आवाहन आव्हाड यांनी केले.

Related posts: