|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पतीच्या खूनप्रकरणी पत्नीला जन्मठेप

पतीच्या खूनप्रकरणी पत्नीला जन्मठेप 

प्रतिनिधी/  सांगली

पतीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी वैशाली कैलास पवार उर्फ वैशाली हरि काळे वय (40) रा सलगरे हिला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यातील मयत हरि काळे हा रेल्वेमध्ये मुकादम म्हणून काम करित होता. पहिली पत्नी सन 2008 मध्ये मयत झाली. त्यानंतर आरोपी वैशालीबरोबर ओळख होऊन, ते दोघे एकत्र राहू लागली. वैशाली हिचेही दोन लग्ने झाली होती. तिने पहिल्या नवऱयाशी व सासरच्या लोकांशी भांडण करुन, दागिने व पैसे माहेरच्या लोकांना दिले होते. तसेच पती हरि यास पगारचे पैसे माहेरच्या लोकांना का देत नाहीस, यावरुन दोघांचे वारंवार भांडण होत होते. दि. 14 जून रोजी रात्री मयत आणि आरोपी हे व्हरांडय़ात झोपले होते. त्यांच्यासोबत मुलेही झोपली होती. यावेळी रात्री वैशाली हिने पती हरि याच्या डोक्यात मोठा दगड मारुन खून केला. डोक्यात दगड पडून मयत झाल्याचे भाऊ दिगंबर यांना तीने फोन करुन सांगितले. पण, या घटनेबाबत मयताचा भाऊ दिगंबर यास आरोपी वैशालीचे वागणे व तिची पार्श्वभूमी माहिती असल्याने वैशालीनेच भावाला मारल्याचा संशय आला. त्यामुळे दिग्ंाबर काळे याने आरोपी वैशाली विरोधात कवठेमहांकाळ पोलिसांत फिर्याद दिली. याबाबतचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी केला. ठोस पुरावे गोळा करुन जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर सुनावणी झाली. पुराव्याच्या आधारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र तावडे यांनी आरोपी वैशाली कैलास पवार उर्फ वैशाली हरि काळे हिला भा.दं.वि.सं. कलम 302 अन्वये दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच पाच हजार रुपयांचा दंड केला. दंड न भरल्यास तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा दिली.

 

Related posts: