|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नाराजीने कार्यकर्त्याने भाजप शहराध्यक्षांच्या कानशिलात लगावली

नाराजीने कार्यकर्त्याने भाजप शहराध्यक्षांच्या कानशिलात लगावली 

वार्ताहर/ सोलापूर

महापालिका निवडणुकीत हक्काच्या नेत्याला सोडून ऐन वेळी दुसऱयाच एकाला तिकीट दिल्याने जज झालेल्या कार्यकर्त्याने थेट भाजप शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांच्या कानशिलात लगावली. यावेळी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान तिकीट वाटपात व्यक्तीशः राजकारण करत घोडेबाजारातून तिकीट दिल्याचे मत कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

सोलापूर महापालिकेतील निवडणूकीत सर्वच प्रमुख पक्षांची धावपळ आणि उमेदवारी आणि प्रत्यक्ष तिकीट वाटपाचा गोंधळ शुक्रवारनंतरच कायम चर्चेत आहे. दरम्यान शुक्रवारी तिकीट वाटपात भाजपातील काही पदाधिकाऱयांची घोडेबाजार करुन नाव एकाचे अन तिकीट दुसऱयालाच दिल्याचे समजते. हा प्रकार म्हणजे पार्टी विथ डिफरन्स म्हणविणाऱया पक्षाला चिंतन करणारा ठरला आहे. पक्षाकडून शेवटपर्यंत तिकीट फायनल झाले होते पण ऐनवेळी तिकीट दुसऱयाला दिल्याचा प्रकार काही उमेदवारांनी सांगितला. भाजपचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांची अडचण पालकमंत्र्यांना काही दिवसापासून जाणवत होती. त्यामुळे बापु गोटात गेले शहराध्यक्ष निंबर्गी यांनी मालक गटाची तिकीटे कापून वा प्रत्यक्ष घोडेबाजार करुन ठरविल्याची नाराजी अनेकांनी व्यक्त केली.

नाराजांची मोठी फळी

भाजपच्या शेवटच्या एकूणच राजकारणाचा फटका त्यांना येत्या निवडणुकीत बसण्याची शक्यता असून कार्यकर्त्याकडून थेट पदाधिकाऱयांशी मारहाण होते हा पसखासाठी चिंतनाचा विषय आहे.

Related posts: