|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भाजपासहीत 38 उमेदवारांचा अर्ज अवैध

भाजपासहीत 38 उमेदवारांचा अर्ज अवैध 

वार्ताहर/ सोलापूर

भाजपाच्या उमेदवार विजया वड्डेपल्ली आणि वृषाली चालुक्य यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱयांनी अवैध ठरविला आहे. 15 वर्ष नगरसेविका असलेल्या भाजप उमेदवार विजया वड्डेपल्ली यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. त्यात प्रभाग 16 च्या वृषाली चालुक्य यांचाही अर्ज अवैध ठरल्याने भाजपाच्या ऐन तोंडावर एबी फॉर्म देण्याच्या प्रकाराने हि नामुष्की ओढवली आहे.

एकूण 1067 पैकी 1024 जणांचे अर्ज वैध आहेत.

सकाळी निवडणूक कार्यालयात उमेदवारांच्या साक्षीने अर्जाच्या छाननीस सुरुवात झाली. अर्ज छाननीवेळी भाजपा उमेदवार वड्डेपल्ली यांनी प्रभाग 13 ब आणि क मधून दोन अर्ज भरले होते. दोन्ही अर्जात एकच सूचक व अनुमोदक होते. मात्र ज्या अर्जाला पक्षच बी फॉर्म जोडला होता, त्यात त्यांनी सूचकाचे नाव पेनाने खोडून दुसरे नाव लिहिले. फॉर्मवर केलेली खाडाखोड यावर काँग्रेस उमेदवार राधा होमकर यांनी आक्षेप नोंदवला.

आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी वड्डेपल्ली यांचा अर्ज बाद केला. त्यामुळे वड्डेपल्ली आता भाजपाकडून निवडणूक लढू शकणार नाहीत. मात्र प्रभाग 13 ब मधून त्यांचा अर्ज अपक्ष म्हणून मंजूर आहे. त्यामुळे त्या भाजपाच्याच अधिकृत उमेदवार पूजा धोत्रो यांच्या विरोधात बंडखोरी करुन लढतात की माघार घेऊन येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वड्डेपल्लींचा अर्ज बाद झाल्याने प्रभाग तेरा मधील भाजपा पॅनल कमकुवत झाला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची ताकद वाढली असून भाजपच्या रणनीतीचा भाजपालाच फटका बसल्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याचप्रमाणे प्रभाग 16 मधून भाजपाच्या उमेदवार वृषाली चालुक्य यांचे अनुमोदक प्रत्यक्ष नव्हते. तसेच लिखीत बाबींमध्ये दोष आढळल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरल्यानंतर भाजपाला दुसरा धक्का ठरला. त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या फिरदोस पटेल यांनी आक्षेप घेतला होता.

 

 

 

 

Related posts: