|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » उस्मानाबाद , नाशिक , अहमदनगर व मुंबई उपनगरचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत

उस्मानाबाद , नाशिक , अहमदनगर व मुंबई उपनगरचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत 

वार्ताहर  / पालघर

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व पालघर जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 33 व्या किशोर-किशोरी (14 वर्षाखालील) गटाची राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत मुंबई उपनगर, उस्मानाबाद, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, सांगली व पुण्याच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

  मुंबई उपनगरची कर्णधार साक्षी वाफेलकरच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबई उपनगरने मुंबईचा (8-2,0-2) 8-4 असा 1 डाव व 4 गुणांनी सामना पराभव केला. साक्षीने संरक्षणात दोन्ही डावात अनुक्रमे 3 मि व 2 मिनीटे नाबाद वेळ नोंदवली व आक्रमणात संघासाठी 3 गुणांची कमाई केली. साक्षी बरोबरच ग्रीष्मा माईन (3.30 मि व 2 गडी), साक्षी कृ. जाधव (2.20 मि व 1 गडी) व पूर्वा सरफरेने (1.40 मि व 1.30 मि ) देखील विजयात मोलाचा वाटा उचलला. मुलांच्या गटात मुंबई उपनगरने यजमान पालघर संघावर (9-2,0-2) 9-4 अशी 1 डाव व 5 गुणांनी मात केली. मुलींप्रमाणे मुलांमधे देखील कर्णधार सिद्धेश थोरातने कप्तानपदाला साजेसा खेळ केला. सिद्धेशने पहिल्या डावात नाबाद 3.40 मि नाबाद तर दुसऱया डावात 4 मिनीटे छान हुलकावण्या दिल्या, धीरज भावेने आक्रमणात 5 गडी टिपले तर कुणाल पाटीलने 2.40 मिनीटे संरक्षण केले.

  सबज्युनियर गटात गतवर्षी अजिंक्यपद पटकावणाऱया पुण्याच्या दोन्ही संघानी आपली घौडदौड सुरू ठेवली आहे. शनिवारी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत पुण्याच्या मुलींनी पालघर संघावर (5-3,2-2) 7-5 असा 2 गुण व 4.50 मिनीटे राखून पराभव केला. पुण्याच्या सबज्युनियर गटातील राष्ट्रीय खेळाडू हर्षदा करे (3.20 मि व 1.50 मि नाबाद),व साक्षी करे (1.20 मि,2.20 मि व 3 गडी) यांच्या खेळासमोर पालघर संघ हतबल ठरला. पुण्याच्या राधिका शिंदेने संरक्षणात 1.50 मि व 2.50 मिनीटे खेळ केला. पुण्याच्या मुलांच्या संघाने रायगड वर (13-0,0-2) 13-2 अशी 1 डाव व 11 गुणांनी मात केली. विजयी संघाच्या प्रविण आगवणेने 7 पैकी 5.20 मिनीटे नाबाद संरक्षण केले तर रविकिरण 3.40 मिनीटे खेळला.

 गतवर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील महाराष्ट्राच्या संघाचा कर्णधार नाशिकच्या चंदू चावरने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत रत्नागिरी विरूद्धचा सामना (9-2,1-7) 10-9 असा 1 गुण व 5.40 मिनीटे राखून एकहाती सामना जिंकून दिला. चंदूने 5.40 मि व 2.10 मि खेळ संरक्षण करून आक्रमणात 6 गडी टिपले. नाशिकच्या मुलींनी सोलापूरवर (7-4,8-5) 15-9 अशी 6 गुणांनी मात केली. अहमदनगरच्या किशोर संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात ठाण्याचा (7-8,9-7) 16-15 असा 1 गुण व 40 सेकंद राखून पराभव केला. मध्यंतराला अहमदनगर संघ एका गुणाने पिछाडीवर होता. नगरच्या अदित्य कुदळे (2 मि व 2गडी) ने उल्लेखनीय कामगिरी केली. अहमदनगरच्या मुलींची लातूर संघा विरूद्भच्या सामन्यात (9-2,0-3) 9-5 अशी 1 डाव व 4 गुणांनी सरशी झाली. अहमदनगरच्या भाग्यश्रीने 3.40 मि संरक्षण केले.

  उस्मानाबादच्या मुलींनी अटीतटीच्या सामन्यात रत्नागिरी संघाचे कडवे आव्हान (4-3,4-4) 8-7 असे केवळ एका गुणांने मोडून काढत उपांत्यपूर्व फेरी गाठली. उस्मानाबाद संघाने सामना संपायला केवळ 1.20 मिनीटे शिल्लक असताना रत्नागिरीच्या खेळाडूला बाद करून विजय संपादन केला. उस्मानाबादकर मुलांनी सातारा संघावर (9-3,0-5) 9-8 अशी एका गुणाने डावात मात केली. उस्मानाबादच्या मनोज जाधव (2.40 मि व 1.50 मि), बजरंगराज गोडसे (2.20 मि,1.40 मि व 2 गडी) छान खेळ केला.  

  औरंगाबादच्या मुलींच्या संघाने गतवर्षीच्या उपविजेत्या ठाणे संघावर (9-4,0-3) 9-7 अशी 1 डाव व 2 गुणांनी मात करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. औरंगाबादच्या सोनल जाधव (2.40 मि व 3 गडी) व ऋतुजा सुराडकर (1.50 मि व 4 गडी) विजयाच्या प्रमुख शिल्पकार होत्या. औरंगाबादच्या अतुल गायकवाड (3.50 मि,3.30 मि व 1 गडी), राहूल पवार (2.30 मि व 2 गडी) व गणेश कामडे (2.40 मि नाबाद व 1 गडी) यांनी सुरेख खेळ करत आपल्या संघाला बीड विरूद्भच्या सामन्यात (7-2,0-2) 7-4 असा 1 डाव व 3 गुणांनी विजय प्राप्त करून दिला.

  सांगलीच्या मुलांच्या संघासमोर मुंबईचा निभाव लागला नाही, सांगलीने (13-4,0-3) 13-7 अशी 1 डाव व 6 गुणांनी मात केली. सांगलीने पहिल्या डावात 13 गुणांची कमाई करून सामन्यावर प्रभूत्व प्राप्त केले. सांगलीच्या सौरभ अहिरने सामन्यात 5 गडी टिपले, आदेश जाधवने 2.20 मिनीटे संरक्षण करून संघासाठी 2 गुण मिळवले व श्रेयस ने 3.10 मि पळतीचा खेळ करून 3 गडी टिपले. सांगलीच्या मुलींनी जळगावला (16-1,0-4) 16-5 असे 1 डाव व 11 गुणांनी हरवले. विजयी संघाच्या पुष्पा इंगोळेने 5.30 मि पळतीचा खेळ करून 3गुण मिळवले तर  रितीका मगदूमने प्रतिस्पर्धी संघाचे 4 गडी बाद केले. 

  मुलांच्या गटात सोलापूरने धुळयाचा (14-2,0-5) 14-7 अशी 1 डाव व 7 गुणांनी पराभव केला. सोलापूरच्या रामजी कश्यप (3.10 मि नाबाद व 4 गडी), संकल्प चव्हाण (2 मि) व ज्योतिरादित्य गायकवाड (1.50 मि,2.10 मि व 2 गडी) यांनी सुरेख खेळ केला. किशोरी गटात सातारा संघाला जालन्यावर (11-0,0-2) 11-2 अशी 1 डाव व 9 गुणांनी मात करताना विषेश प्रयत्न करावे लागले नाहीत. साताऱयाच्या पुजा फडतरेने 5.20 मि नाबाद संरक्षण केले.

उपांत्य फेरीचे सामने खालील प्रमाणे होतील.

किशोर गट

किशोरी गट

पुणे वि. उस्मानाबाद

पुणे वि. नाशिक

औरंगाबाद वि. सोलापूर

उस्मानाबाद वि. अहमदनगर

अहमदनगर वि. मुंबई उपनगर

सांगली वि. मुंबई उपनगर

सांगली वि. नाशिक

सातारा वि. औरंगाबाद

Related posts: