|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दापोली, मंडणगडातील सेना पदाधिकाऱयांना डच्चू?

दापोली, मंडणगडातील सेना पदाधिकाऱयांना डच्चू? 

प्रतिनिधी/ चिपळूण

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेंतर्गत उफाळलेल्या गटबाजीवर कठोर निर्णय घेण्याचा विचार ‘मातोश्री’वर सुरू झाला आहे. यातूनच ऐन निवडणूक रणधुमाळीतच दापोली आणि मंडणगड तालुक्यातील काही पदाधिकाऱयांना डच्चू देण्याची खलबते सुरू आहेत.

  या मतदार संघात विशेषत: दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यात उमेदवार यादीवरून सुरू असलेला घोळ, त्यातच होत असलेल्या सुधारीत याद्या आणि तरीही यातून समाधानकारक योग्य तो निर्णय होत नसल्याने तिढा निर्माण झाला आहे. यातच थेट पक्षालाच आव्हान देण्याचे काम सुरू झाल्याने याची लागण अन्यत्र होऊ नये यादृष्टीने खबरदारी घेत सेना नेत्यांमध्ये खलबते सुरू झाली आहेत.

  यातूनच काही पदाधिकाऱयाना थेट डच्चू देऊन त्याठिकाणी अन्य पदाधिकाऱयांची नेमणूक करण्याचा विचार सुरू झाला आहे. येत्या दोन दिवसांत त्यावर अपेक्षित निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सेनेच्या सूत्रांकडून देण्यात आली.

 

 

Related posts: