|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकण-प. महाराष्ट्र रेल्वे ‘ट्रक’वर!

कोकण-प. महाराष्ट्र रेल्वे ‘ट्रक’वर! 

प्रतिनिधी/ चिपळूण

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र रेल्वे लाईने जोडण्याचे स्वप्न प्रभु कृपेने लवकरच साकार होणार आहे.  पेंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून बहुप्रतीक्षित चिपळूण-कराड आणि वैभववाडी-कोल्हापूर या दोन रेल्वे मार्गासाठी  तब्बल 550 कोटींची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे व्यापार आणि उदयोगांना मोठा फायदा मिळणार आहे.

   रेल्वेमंत्री प्रभू यांनी सलग तिसऱया वर्षी कोकण रेल्वेच्यादृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पहिल्या वर्षी चिपळूण-कराड, तर गेल्यावर्षी वैभवाडी-कोल्हापूर या नव्या रेल्वेमार्गांची घोषणा करण्यात आली होती. यावर्षी त्याच्यापुढील पाऊल उचलताना या दोन्ही मार्गासाठी प्रत्यक्षात आर्थिक तरतूदही केली आहे. त्यानुसार चिपळूण-कराड रेल्वेमार्गासाठी 300 कोटी, तर वैभववाडी-कोल्हापूरसाठी 250 कोटीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. त्याचबरोबर रेल्वेद्वारे बंदरे जोडण्याच्या योजनेचा भाग म्हणून सावंतवाडी ते रेडी या नव्या मार्गाच्या सर्वेक्षणाचीही घोषणा करण्यात आली आहे.

कराड मार्गाला 25 वर्षांनी मुहूर्त

  कोकण रेल्वे सुरू झाल्यावर 25 वर्षांनंतर कराड-चिपळूण रेल्वेमार्गाचा करार गेल्या स्वातंत्र्यदिनी करण्यात आला. पाच वर्षांत हा मार्ग पूर्ण होईल. देशातील पहिला ‘पीपीपी’ अर्थात सार्वजनिक-खासगी भागीदारीतून हा प्रकल्प आकाराला येत आहे. कोकण रेल्वे मार्गावर 103 कि. मी. लांबीचा वर्षानुवर्ष कागदावर असलेल्या या प्रकल्पाच्या बांधणीचा खर्च आघाडी सरकारच्या काळात असलेल्या 928.10 कोटींवरून तो आता 3 हजार 195 कोटी 60 लाखांवर पोहचला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रेल्वेच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी योजनेतून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. व शापूरजी पालोनजी कॉर्पोरेशन या कंपन्यांमध्ये सामंजस्य करारही झाला आहे. कोकण रेल्वेच्या उभारणीनंतर आता हा सर्वांत मोठा मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी शापूरजी पालोनजी कंपनीचे 74 टक्के समभाग असून कोकण रेल्वेचा वाटा फक्त 26 टक्के आहे.

जिल्हय़ाचे चित्र पालटणार

 जिह्यात चौगुले, जिंदाल, फिनोलेक्स, आरजीपीपीएल कंपनीची बंदरे आहेत. जहाज बांधणीसाठी लावगण डॉकयार्ड सुरू आहे. पायाभूत सुविधांसमवेत कोकणात आगामी काळात होणाऱया मोठय़ा गुंतवणुकीचा विचार केला तर या रेल्वे मार्गाचे महत्त्व लक्षात येईल. किनारी भागात म्हणजे चिपळूणपासून अवघ्या 50 कि. मी.च्या परिसरात केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून उभारला जाणारा तब्बल 16 दशलक्ष टन क्षमतेचा तेलशुद्धीकरण प्रकल्प, मार्गताम्हानेतील प्रस्तावित एमआयडीसी, लोटे येथील औद्योगिक वसाहत, तिथेंच होऊ घातलेला रेल्वेच्या स्पेअर पार्टचा  कारखाना, तसेच सुमारे एक हजार कोटींची गुंतवणूक असलेला कोका-कोलाचा प्रस्तावित प्रकल्प यामुळे या भागाचे चित्र पालटणार आहे. या औद्योगिकरणाच्या प्रक्रियेला या नव्या मार्गामुळे अधिकच गती मिळेल अशी अपेक्षा आहे.

चिपळूण, कराड स्थानके होणार ‘जंक्शन

   मार्च 2011मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड-चिपळूण या मार्गासाठी आग्रही भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्य शासनाने खर्चाच्या पन्नास टक्के वाटा उचलण्याचे जाहीर करत तशी अर्थसंकल्पात तरतूदही केली. चिपळूणपासून सातारा जिह्यातल्या कोपार्डे रेल्वे स्थानकाशी हा मार्ग जोडला जाणार आहे. यामुळे चिपळूण व कराड ही दोन्ही स्थानके जंक्शन होणार आहेत. 

चिपळूण-कराड रेल्वेमार्गात नऊ स्थानके  

103 कि. मी. लांबीच्या या रेल्वेमार्गासाठी सुमारे 3195.60 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये रत्नागिरी जिह्यात 37 कि. मी., तर सातारा जिह्यात 66 कि. मी.चा मार्ग असणार आहे. या रेल्वेमार्गात कराड, चिपळूण, वेहळे, मुंढे, कोयना रोड, पाटण, शेडगेवाडी, खोडशी ही स्थानके प्रस्तावित असून 46 किलोमीटरचे बोगदे आहेत. यामध्ये कुंभार्ली घाटात 7 कि. मी. लांबीचा बोगदा सर्वात मोठा असणार आहे.

 

Related posts: