|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » Top News » भाजपचे 227 उमेदवार हुतात्मा स्मारकाला करणार अभिवादन

भाजपचे 227 उमेदवार हुतात्मा स्मारकाला करणार अभिवादन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे 227 उमेदवार हे हुतात्मा स्मारकाला अभिवादन करणार आहेत. या स्मारकाच्या अभिवादनानंतर सर्व उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ दिली जाणार आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या सर्व उमेदवारांचा मेळावा होणार आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत या सर्व उमेदवारांना पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ दिली जाणार आहे. अशा प्रकारे 227 उमेदवार एकत्र येऊन स्मारकाला अभिवादन करणार असल्याने या अभिवादन कार्यक्रमावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related posts: