|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » मनोरंजन » माणूस-एक मातीमध्ये सिद्धार्थ जाधवचा हटके लूक

माणूस-एक मातीमध्ये सिद्धार्थ जाधवचा हटके लूक 

आताच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांचा कसा विसर पडतो याचं चित्रण करणारा  ‘माणूस एक माती’ हा चित्रपट 24 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव एका वेगळय़ा लुकमध्ये दिसणार आहे.

शिवम एंटरटेन्मेंट इंडिया लिमिटेडच्या शारदा खरात या चित्रपटाच्या निर्मात्या तर डॉ. विजयकुमार खरात सहनिर्माते, चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश झाडे यांचे आहे. कार्यकारी निर्माता देवा पांडे आणि संगीतकार आणि गीतकार प्रशांत हेडाऊ आणि अमर देसाई अशी या चित्रपटाची टीम आहे. बदलत्या काळातली नाती, नात्यांकडे पाहण्याचा बदलणारा दृष्टीकोन या आशयसूत्रावर माणूस एक माती बेतला आहे. हा एक सकस कौटुंबिक चित्रपट आहे. सिद्धार्थ जाधव आणि गणेश यादव यांच्या  दमदार भूमिका हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ असून, सिद्धार्थ वेगळय़ा लुकमध्ये दिसणार आहे, त्यांच्या बरोबर स्वप्नील राजशेखर, रूचिता जाधव, हर्षा गुप्ते, वरद चव्हाण हे सहकलाकार आहेत. माणूस एक माती या चित्रपटाच्या मार्पेटिंग-प्रमोशनसाठी केवळ महिलांचा सहभाग असलेली शिवम सहेली परिवार ही संस्था काम करणार आहे. मराठी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये हा वेगळा प्रयोग ठरणार आहे. 8 मार्चच्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ही संस्था मार्पेटिंग क्षेत्रात पदार्पण करत आहे, असे निर्मात्या शारदा खरात यांनी सांगितले.

Related posts: