|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महावितरणची शेतकऱयांच्या वरती ‘स्लो पॉईझिंनिंग’ अरेरावी

महावितरणची शेतकऱयांच्या वरती ‘स्लो पॉईझिंनिंग’ अरेरावी 

महादेव पाटील/ कुरळप
ऐन उन्हाळ्याच्या तेंडावरतीच वीज खंडीत करुन शेतकऱयांच्या वरती दबावतंत्राचा वापर महावितरण करीत आहे. तसेच हळूहळु वीज दरवाढीचा शॉक सुध्दा शेतकऱयांना देत आहे. महावितरणची ही खेळी म्हणजे ‘स्लो पॉईझिंनिंग’ आहे. या प्रकाराला वेळीच आळा घातला नाहीतर शेती व शेतकरी उध्वस्त होण्याची शक्यता आहे. महावितरणच्या या अशा प्रकाराबाबत शेतकऱयांतून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.
वाळवा व शिराळा तालूक्यातील वारणा व मोरणा नदीकाठ जवळपास शंभर टक्के बागायत क्षेत्राखालील आहे. यामुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारची समृध्दता निर्मीतीस आलेली आहे. यासोबतच या दोन तालूक्यातील इतर बराचसाच भाग हा आता सिंचनाखाली आला आहे. नदीच्यां पासून दुर असणाऱया गांवाच्या पर्यंत साखर कारखान्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा संस्था कार्यन्वीत करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये राजारामबापू , विश्वास आणि वारणा हे साखर कारखाने आघाडी वरती आहेत. या कारखान्यांनी स्वतः बँकांचे जामीन राहून बँकांच्या कडून कर्जे घेतली आहेत. यातून या शेती पाणीपुरवठा संस्था कार्यन्वीत झालेल्या आहेत. आज या संस्था 20 ते 25 वर्षाच्या झालेल्या आहेत.
या पाणीपुरवठा संस्था कार्यन्वीत झाल्याने शिराळा तसेच वाळवा तालूक्यात मोटय़ा प्रमाणात उढसाचे उत्पादन वाढले आहे. ऊसाला बारमाही पाणी आवश्यक असते ते उपलब्ध झाल्याने ऊसाचे विक्रमी पिक येथील शेतकरी घेवू लागला आहे. या शेती पाणीपुरवठा संस्था कारखान्यांच्या माध्यमातून कार्यन्वीत करण्यात आलेल्या असून त्या सहकारी तत्वारती चालविल्या जात आहेत. त्यामुळे या संस्थाच्या वरती कोणा एकाची मालकी नसून सर्व सभासदांची मालकी प्रस्तापीत करण्यात आलेली आहे. प्रत्येक शेतकरी ही संस्था माझी म्हणूनच कार्यरत रहात आहे. यामुळे शेती व शेतकऱयांच्या समृध्दतेत आवश्यक अशी मोटी वाढ झालेली आहे.
परंतू या समृध्दतेला आळा घालण्याचे काम आता दिवस्नेदिवस महावितरण कडून होत असल्याचे दिसून येवू लागले आहे. शुक्रवारी अचानकच महावितरण कडून शेती पाणीपुरवठा संस्थाची वीज खंडीत करण्यात आली. अचानक महावितरण कडून असा प्रकार घडल्याने या संस्था अंचबिंतच झाल्या. कारण कोणतीच पुर्व सुचना नसताना महावितरण कडून वीज खंडीतचा घेतलेला निर्णय चुकीचा व तोटा करणारा होता. ऊस गळीत हंगाम अंतीम टप्प्यात आला आहे. त्यामुळे ऊस तुटावयाच्या अगोदर ऊसाला आवश्यक व गरजेएवढे पाणी मिळणे आवश्यक आहे. नाहीतर शेवटच्या काळात पाण्याचा तुटवडा भासल्याने ऊसाच्या उत्पादनात निश्तिपणे घटीची शक्यता राहते. हा धोका होण्याची शक्यता असल्याने या पाणीपुरवठा संस्था महावितरणच्या या निर्णयामुळे हादरुन गेल्या होत्या. याशिवाय लागण तुटून गेलेल्या शेतकऱयांनी आता ऊसाची खोडवी ठेवलेली आहेत. या खोडव्यांनाही पाणी कमतरतेचा मारा बसू शकतो.
ऐन ऊन्हाळ्याच्या आणि पाण्याची गरज असतानाच महावितरण कडून वीज खंडीत करण्याचा निर्णय जाणूनबूजून घेतला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महावितरण अशा पध्दतीने शेतकऱयांच्या वरती दबावतंत्राचा वापर करुन वीज दरवाढ करु पहात आहे. यापुर्वी पाणीपुरवठा संस्थाची वीज बीले ही प्रतियुनिट 92 पैसे दरानी आकारणी करुन येत होती. परंतू पाणीपुरवठा संस्था या 72 पैसे प्रमाणेच बील चुकते करत होती. याकरीता आघाडी सरकारचे सहकार्य शेतकऱयांना होते. परंतू आता महावितरण पाणीपुरवठा संस्थाची बीले ही 1 रुपये 16 पैशानी आकारु लागली आहे. वाढीव पटीने एकदम वाढून आलेली ही वीज बील शेती व शेतकऱयांना अर्थिक फटका बसविणारी आहेत.
आघाडी सरकारकडून शेतकऱयांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करुन दिल्यामुळे वील बिले मर्यादीत व शेतकऱयांच्या आवाक्यात येत होती. त्या बिलाचां भार शेतकऱयांना फारसा वाटत नव्हता. परंतू आता मात्र शेतकऱयांच्या डोक्यावरुन पाणी फिरविण्याचा बेत या सरकारने आखला आहे काय अशा संतापजनक प्रतिक्रीया उमटू लागलेल्या आहेत. यामध्ये महावितरणच्या काळ्या बाजाराचे असे अनेक प्रकार आहेत की यातून शेतकरी देशोधडीला लागेल. त्यामुळे महावितरणचा हा उधळणारा वारु रोखणे आवश्यक आहे. नाहीतर शेती व शेतकरी उध्दवस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुहतोड जबाब महावितरणला मिळाला तरच महावितरणचा स्लो पॉईजिंनिंग प्रकार थांबेल अन्यथा तो वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related posts: