|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भाजप सेनेच्या वादाने जनता वाऱयावर : अशोक चव्हाण

भाजप सेनेच्या वादाने जनता वाऱयावर : अशोक चव्हाण 

वार्ताहर/ सोलापूर

शिवसेना नेते उद्धव ठाकरे युती तोडून स्वाभिमान जिवंत ठेवल्याचे सांगतात तर दुसरीकडे राज्यात सत्तेत राहून सत्तेचा वाट उपभोगत आहेत. तर भाजपाची भूमी काही पाहता सेना आणि भाजप यांच्यात सेटलमेंट झाली आहे. सत्ता आणि कुरघोडीच्या राजकारणाने जनतेला वाऱयावर सोडल्याची टिका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. आगामी निवडणूकीत काँग्रेसच पुढे राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोलापूर जिल्हापरिषद आणि महापालिकेच्या पंचवार्षीक निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ अशोक चव्हाण यांनी फोडला. त्यानंतर रविवारी सकाळी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना मराठी माणसाची अस्मिता असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडाव, भाजप शिवसेनेचे आरोप प्रत्यारोप म्हणजे केवळ नाटक आहे. मुंबई व राज्यातील शिवसेना भाजप ची युती तोडणे हा युती सरकारचा दिखाऊपणा आहे. भाजप व शिवसेनेचे नेते एकमेंकावर आरोप करुन आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याची प्रयत्न करुन असून निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणार आहेत. राज्यातील महापालिका जिल्हापरिषद व पंचायत समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता येणार असल्याचा विश्वास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकांना कॅशलेसच आवाहन करायच आणि नेत्यांनी उमेदवारीसाठी कॅश मागायची हे कसल सोंग शब्दात नाशिक मधील भाजप अध्यक्षाने पैसे घेतल्याच्या प्रकरणावर चव्हाण यांनी टिका केली.

आरबीआय म्हणजे आरएसएसची शाखा नाही.

सरकार देशात नोटाबंदी, कॅशलेस यासह आर्थिक विषयावरील घेतले जाणारे निर्णय आरएसएसच्या शाखेतून घेतले जातात सरकारने आपल्या निर्णयासाठी आरबीआयची स्वायत्तता गहाण ठेवली. सरकारची वागणूक म्हणजे रिझर्व्ह बँकेला आरएसएसच्या शाखेप्रमाणे करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.

Related posts: