|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गुरूरत्न वॉरियर्स चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी !

गुरूरत्न वॉरियर्स चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी ! 

रत्नागिरी/  प्रतिनिधी

येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेलया रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 स्पर्धेत दत्तप्रासादिक खालची आळी संघाचा 27 धावांनी पराभव करत गुरूरत्न वॉरियर्स संघाने विजेतेपद पटकावले आहे. मनोज सकपाळला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. थर्ड अंपायर  ही खास उपांत्या व अंतिम सामन्यासाठी उपलब्ध करून दिलेली सुविधा शेवटच्या दिवशी स्पर्धेची उंची आणखी वाढवून गेली.

     ओम साई स्पोर्टस् आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शनिवारी दोन उपांत्य सामन्यासह अंतिम सामना खेळवण्यात आला. स्पर्धेनंतर विजेत्या , उपविजेत्या संघासह सर्वोत्कृष्ट वैयक्तिक कामगिरी करणाऱया खेळाडूंना गौरवण्यात आले. विजेत्या संघाला 2 लाख तर उपविजेत्या संघाला 1 लाख रूपये व चषक देऊन गौरवण्यात आले.  यावेळी प्रविण आमरे यांच्यासह  रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक किरण उर्फ भैय्या सामंत, नगराध्यक्ष राहूल पंडित, उद्योजक अण्णा सामंत, ओम साई स्पोर्टस्चे अध्यक्ष पराग सावंत, उपाध्यक्ष दीपक पवार, रजनीश परब यांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अभिजीत गोडबोले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

        अंतिम सामन्यात गुरूरत्न वॉरियर्स फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर इजाज कुरेशी, कृष्णा सातपुते, मुकेश गोयल हे तीन फलंदाज दुसऱया षटकातच पॅव्हेलियनमध्ये परतले. या स्थितीत मनोज सकपाळ 28, पंकज जाधव 21 तर  योगेश पेणकरने 17 धावा केल्याने संघाने 80 धावांचा टप्पा ओलांडला.  हे आव्हान दत्तप्रासादिकला पेलले नाही. सुमित ढेकळेने 2 षटकार ठोकत आशा निर्माण केली. मात्र, तो बाद झाल्यानंतर अस्लम शेख 18 धावा वगळता कुणाला फारशा धावा करता आल्या नाहीत. अखेर निर्धारित षटकात त्यांना 56 धावांपर्यंतच मजल मारता आली.

     तत्पुर्वी  पहिल्या उपांत्य सामन्यात महालक्ष्मी नेवरे संघाने 6 षटकात केवळ 34 धावा जमवल्या. बापु काडताळे याने सर्वाधिक 14 धावा काढल्या. संदेश पार्टे आणि तुकाराम कुंचे यांना प्रत्येकी दोन तर अविनाश रामगडे यांनी एक बळी मिळवत नेवरेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. हे लक्ष्य गुरूरत्न वॉरियर्सने तीन गडय़ांच्या बदल्यात चौथ्या षटकातच पार करत अंतिम फेरी गाठली. योगेश पेणकरने एक षटकार आणि दोन चौकारसह  18 धावा काढल्या.  या सामन्यात संदेश पार्टे याला सामनावीर हा सन्मान देण्यात आला.

    दुसऱया उपांत्य सामन्यात तिरूपती बालाजी संघाला 37 धावांवर रोखण्यात  दत्तप्रासादिकला यश आले.  भूषण गोले याने सर्वाधिक 12 धावा केल्या. तर दत्तप्रासादिकच्या राजु बोगा याने 3 गडी मिळवले. दत्तप्रासादिकने हे आव्हान पाचव्या षटकात पार कतर अंतिम फेरी गाठली होती. सामन्यात राजु बोगा याला समानावीर घोषित करण्यात आले.

Related posts: