|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » टेनिस क्रिकेटचे बादशाहच अखेर ‘चॅम्पियन्स’ !

टेनिस क्रिकेटचे बादशाहच अखेर ‘चॅम्पियन्स’ ! 

किरण बेडेकर/ रत्नागिरी

सलग तीन वर्षे विजेतेपद पटकावणारा साईरत्न चॅलेंजर्स संघ यंदाही विजयाचा प्रबळ दावेदार आहे, असे अनेक प्रेक्षकातून मानले जात होते. मात्र, या संघातील बहुंताश स्टार क्रिकेटपटू यंदा गुरूरत्न वीरयर्सकडून खेळणार हे स्पष्ट झाल्यावर हाच संघ यंदा या ट्रॉफीचा मानकरी होणार, असे जाणकारांचे मत होते. हा विश्वास सार्थ ठरवत टेनिस क्रिकेट विश्वातील बादशाह मानला जाणाऱया या संघानेच  अखेर यंदा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

 वॉरियर्सने प्राथमिक फेरीत ऑल चांदेराई पुढे वायसीसी पावस, गावदेवी मुंबई या संघांवर मात करत उपांत्य फेरीत मजल मारली. उपांत्य फेरीत महालक्ष्मी नेवरेचाही सहज पराभव करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. प्रथम गोलंदाजी घेऊन समोरच्या संघाला कमीत कमी धावात रोखायचे आणि नंतर धावांचा पाठलाग करायचा अशी रणनीती गुरूरत्नने आखली होती. वॉरियर्सच्या तुकाराम कुंचे, संदेश पार्टे, अविनाश रामगुडे यांसारख्या गोलंदाजांनी ही निती यशस्वी करून दाखवली. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून बहुमान मिळवणाऱया तुकारामचा यात सिंहाचा वाटा आहे.

 खोलवर पसरलेली फलंदाजी हेही या संघाचे गोलंदाजीइतकेच मोठे बलस्थान असल्याचे पहायला मिळाले. कृष्णा सातपुतेसारखा टेनिस विश्वातील सर्वोत्तम मानला जाणारा फलंदाज सातत्याने अपयशी ठरूनही वॉरियर्सवर फारसा परिणाम जाणवला नाही. इजाज कुरेशीने नाबाद 37 धावा ठोकत उपउपांत्य सामना या संघाला जिंकून दिला. अंतिम सामन्यात इजाज, कृष्णा, मुकेश गोयल हे थ्री स्टार अवघ्या दुसऱया षटकात माघारी परतल्यावरही हा संघ अजिबात ढेपाळला नाही. मनोज सकपाळने 28 धावांची खेळी साकारत संघाला मोठी धावसंख्या रचून दिली.  त्याला योगेशनेही काही काळ चांगली साथ दिली.

 योगेश पेणकर हा संयमी फलंदाज हे या संघाचे खास वैशिष्टय़ ! संघ कठीण परिस्थितीत असताना त्याने वेळावेळी समयोचित फलंदाजी करत संघाला सावरले आहे. शिवाय हे करत असताना त्याने खुबीने एकेरी, दुहेरी धावा काढत धावफलही सतत हालता ठेवला. यामुळे अशा परिस्थितीतही संघावर कधी दबाव आल्याचे दिसले नाही. योगेशने क्षेत्ररणातही संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. त्याला या कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणूनही निवडण्यात आले.

     वॉरियर्सने अंतिम सामन्यासकट सगळे सामने एकतर्फीच जिंकले. किरकोळ अपवाद वगळता हा संघ कधी अडचणीत आलाय असेही फारसे जाणवले नाही.   बहुतांश मॅचविनर्स यंदा गुरूरत्नकडून खेळल्याने गेली तीन वर्षे जेतेपद पटकावणारा साईरत्नचा संघ तुलनेने दुबळ झाला होता. या संघाला पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला. यामुळे हे दोन संघ समोरासमोर आले नाहीत. मात्र, श्रावणी इलेव्हनविरूद्ध स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा डोंगर रचणाऱया वायसीसी पावस संघाचेही आव्हान वॉरियर्ससमोर होते. मात्र, वॉरियर्सच्या भेदक गोलंदाजांनी त्यांचेही आव्हान मोडून काढले. दत्तप्रासादिक खालची आळी या आणखी एका तगडय़ा संघाचे मोठे आव्हानही त्यांच्यासमोर होते. गतवर्षी शावणी इलेव्हनला उपविजेतपदापर्यंत नेणाऱया सुमित ढेकळेचे यंदा दत्तप्रासादिककडून खेळतानाही बॅट तळपली. मात्र, अंतिम सामन्यात त्यालाही स्वस्तात माघारी धाडत वाŸिरयर्सने दिमाखात रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली.

Related posts: