|Friday, January 24, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » एका पुनर्जन्माची कथा

एका पुनर्जन्माची कथा 

एका अपघातानं हे पुस्तक वाचनात आलं. प्रवासात वाचायला हलकं फुलकं पुस्तक हवं होतं. वाचनालयात दिसलं. मुखपृ÷ पाहून भयकथा किंवा पुनर्जन्म वगैरेवर आधारित प्रेमकथा असावी असं वाटलं म्हणून घेतलं.

मात्र पुस्तक वेगळंच निघालं.

नायक मानसोपचारतज्ञ, सामाजिक कार्यकर्ता आणि लेखक आहे. बायको डॉक्टर. घरातले अनेक जण डॉक्टर्स. नायकाचा एके दिवशी अचानक गुडघा दुखू लागतो. जुजबी उपचारांनी वेदना थांबत नाहीत. मग वेगवेगळय़ा तपासण्या. ऱहुमटाईड आर्थरायटीसचे निदान. सगळे डॉक्टर्स परिचित आहेत. उपचार चालू होतात. अनेक ठिकाणी सूज आणि वेदना वाढत जातात. डॉक्टर अलोपॅथीच्या गोळय़ा आणि गुग्गुळ देतात. वेदनाशामक नको म्हणतात. गोळय़ांनी फरक पडत नाही. नंतर दुसऱया तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारांनी दिशा बदलते. पण आजार बरा होण्याचे नाव घेत नाही. वेदना पाठ सोडत नाहीत. हातापायांच्या लहानसहान हालचाली करणे अवघड होत जाते. डॉक्टर सांगतात की हा बरा होणारा रोग नाही. आता तुम्ही बरे होणारच नाहीत. पण डॉक्टर औषधांच्या जोडीला फिजिओथेरपी सुचवतात. मग तेही सुरू होते.

पुस्तकाच्या दुसऱया भागात उपचाराची दिशा पूर्ण वळण घेते. नायक आपल्या गायक मित्रासह ओशोंच्या एका शिबिराला सहज सोबत म्हणून जातो. तिथे आपणहून शिबिरात भाग घेतो. हातापायांना बँडेजेस असताना सर्व साधकांबरोबर नृत्य करतो. तिथे ध्यानशिबिरात भाग घेतल्यावर त्याचा त्रास ओसरत जातो.परत आल्यावर तो औषधे आणि फिजिओथेरपीच्या जोडीने रोज सक्रिय ध्यान आणि नादब्रह्म ध्यान सुरू करतो. नियमितपणे शिबिरांना जाऊ लागतो. पुढे ओशो आश्रमाची संन्यासदीक्षा घेतो. रोजच्या गोळय़ाचं प्रमाण कमी करीत जातो. यथावकाश बरा होतो. हिमालयात टेकिंग देखील करून येतो.

एका रुग्णाचा असाध्य आजार ध्यानधारणेतून बरा होणे हा चमत्कार वाटेल. कारण तो बरा होण्यामागची कारणे आज अज्ञात आहेत. एक अलोपॅथीचाच डॉक्टर हा स्वानुभव सांगतोय. मात्र या पद्धतीने ऱहुमटाईड आर्थरायटीसचे सगळे रुग्ण बरे होतील का? या प्रश्नाचे ठाम उत्तर तो देत नाही. यात सुरुवातीला वाटलेला आनंद आणि प्लासिबो परिणाम यावर तो काही सांगत नाही. ऱहुमटाईड आर्थरायटीससारखे ऑटोइम्युन आजार आणि ध्यानधारणा यांच्यावर शास्त्रीय संशोधन व्हायला हवं असं सुचवतो.

लेखकाची ही डोळस भूमिका आवडली.

Related posts: