|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘जॉली एलएलबी 2’ च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

‘जॉली एलएलबी 2’ च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा 

न्यायव्यवस्थेला आक्षेपार्ह दृश्य हटविणार, उच्च न्यायालयाने दिली परवानगी

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ‘जॉली एलएलबी -2’ सिनेमा प्रदर्शित करण्यास परवानगी दिली. त्यामुळे निर्मात्यांना दिलासा मिळाला आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री हुमा कुरेशी मुख्य अभिनय साकारणाऱया हा सिनेमा 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

न्याय व्यवस्थेच्या प्रतिमेवर परिणाम होईल अशी दृश्ये सिनेमातून हटवले जातील, असे स्पष्टीकरण निर्मात्यांची वकिलांनी न्यायालयात दिले. वकिलांच्या स्पष्टीकरणानंतर उच्च न्यायालयाने सिनेमाच्या प्रदर्शनाला मुभा दिली. वकिल अजयकुमार वाघमारे, वकिल पंडितराव आनेराव यांनी जॉली एलएलबी 2 विरोधात याचिका दाखल केली होती. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये वकील न्यायालयात पत्ते खेळतात, न्यायमूर्तींच्या डायसवर धावून जातात, न्यायमूर्तींसमोर हाणामारी आणि बीभत्स नफत्यही करतात, असे दाखवण्यात आले आहे. चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे असे लिहून निर्माता आणि दिग्दर्शकांनी न्यायव्यवस्थेची आणि वकिली व्यवसायाची खिल्ली उडवली असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. या यचिकेत फॉक्स स्टार इंडिया स्टुडिओ, चित्रपटाचे निर्माता, लेखक सुभाष कपूर, अक्षयकुमार, अन्नू कपूर, माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव, पेंद्रीय विधी आणि न्याय सचिव, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष, राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाचे सचिव, विधी आणि न्याय विभाग यांना प्रतिवादी करण्यात आले होते. या सिनेमातून समाजात मोठय़ा प्रमाणावर न्यायालयीन व्यवस्थेतून हास्यनिर्मिती करुन न्यायपालिकेची थट्टा करण्यात आली आहे. केवळ ट्रेलरमधूनच कलाकरांनी केलेला अभिनय आणि वापरलेली वाक्यरचना (डायलॉग) हे भारतीय दंडसंहिता आणि न्यायालयीन व्यवस्थेची प्रतिष्ठेला ठेच पोहचविल्यासारखे असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होते.

उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर या सिनेमाच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते.

Related posts: