|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुंबईच्या समुद्रकिनाऱयांवर रंगणार मोटरबोट्सचा थरार

मुंबईच्या समुद्रकिनाऱयांवर रंगणार मोटरबोट्सचा थरार 

3 ते 5 मार्च दरम्यान पार पडणार आगळीवेगळी स्पर्धा

मुंबई / प्रतिनिधी

मुंबईला लाभलेला अथांग समुद्रकिनारा हा पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो.  मुंबईच्या पर्यटनवाढीला हा समुद्रकिनारा नक्कीच मदत करतो. परदेशांमधील समुद्रकिनाऱयांवर रंगणाऱया बोट रेसिंगच्या चित्तथरारक स्पर्धा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. मात्र, मुंबईमध्ये अशा स्पर्धा किंवा कार्यक्रम आजवर आयोजित झाल्या नव्हत्या. मात्र आता ही प्रतिक्षा संपणार आहे. मुंबईच्या समुद्रकिनाऱयांमध्ये मोटरबोट्स रेसिंगचा थरार रंगणार आहे. 3 ते 5 मार्च दरम्यान हा सोहळा रंगणार आहे.

प्रोपॅम इंटरनॅशनल नेक्सा पी 1 पॉवरबोट- इंडियन ग्रँड प्रिक्स ऑफ द सीज या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 3 मार्चला मरीन लाईन्स समुद्र किनाऱयामध्ये या मोटरबोट्सचा चित्तथरारक अनुभव मिळणार आहे. हा खेळाचा नवा प्रकार भारताच्या सागरी किनाऱयाचा चेहरा मोहरा बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नेक्सा पी 1 पॉवरबोट, इंडियन ग्रांड प्रिक्स ऑफ द सीज  प्रथमच पाण्याच्या प्रवाहावर आयोजित करण्यात येत आहे. त्याची तुलना रेस ट्रकशी करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि भारतीय नौदल यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सौजन्याने या सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे आणि यॉटींग असोसिएशन ऑफ इंडिया (वायएआय) चे सहकार्य लाभले आहे. यूनियन इटंरनॅशनल मोटोनॉटीकनेही (युआयएम) ने मान्यता दिली आहे.

या स्पर्धेत 7 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रत्येक संघात दोन पी 1 पॅंथर पॉवरबोट्सचा समावेश असणार आहे. याचे नियंत्रण एक पायलट आणि नेव्हिगेटर करणार आहेत. या स्पर्धा बोटींमध्ये 5.2 किमीच्या पाण्यावरील रेस ट्रकवर होणार आहेत. 4 मार्चला उपांत्य फेरी आणि 5 मार्चला अंतिम फेरी रंगणार आहे. शनिवार आणि ग्रँड फायनल, 5 मार्च रोजी दाखवलेल्या कौशल्यावर अवलंबून असतील. सोहळय़ात जगातील सर्वोत्तम पायलट आणि नेव्हिगेटर सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे पुरुष आणि महिला स्पर्धक एकत्र स्पर्धा करताना दिसणार आहेत.

मेरीटाइम रेसिंग मधील जागतिक स्तरावरील अनोख्या प्रयत्नाला पाठिंबा देताना युआयएम, ऑफशोअर कमिशनचे अध्यक्ष जीन मॅरी व्हॅन लॅकर म्हणाले की, जागतिक अजिंक्यपद मालिकेतील पदार्पणातील शर्यत आयोजित करून इतिहास रचताना मुंबई जगभर चर्चेत राहणार आहे. शर्यतीबाबत असलेले औत्सुक्य आणि अनेक गोष्टी पहिल्यांदाच होत असल्याने हा जागतिक चर्चेचा विषय होणार असून पॉवरबोट रेसिंगचे मापदंड पुन्हा रचले जाणार आहेत.

Related posts: