|Friday, December 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » चीनकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्रासह युद्धसराव

चीनकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्रासह युद्धसराव 

भारत, अमेरिका, जपानवर नजर   रॉकेट फोर्सकडून युद्धाभ्यास, दक्षिण चीन समुद्रात लष्करी हालचाली

वृत्तसंस्था/ बीजिंग

 चीनमध्ये नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या रॉकेट फोर्सने अत्याधुनिक डीएफ-16 मध्यम टप्प्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसह युद्धसराव केला आहे. ही क्षेपणास्त्रs जवळपास 1 हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकतात. भारतासोबत जपान आणि अमेरिका देखील याच्या मारक टप्प्यात येतात. सर्वसाधारणपणे आपल्या शस्त्रास्त्रांचा ताफा आणि लष्करी क्षमतांना गुप्त राखणाऱया चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अलिकडेच करण्यात आलेल्या युद्धसरावाची एक चित्रफीत जारी केली आहे. या चित्रफितीत डीएफ-16 क्षेपणास्त्र दाखविण्यात आले आहे.

या चित्रफितीत अनेक प्रक्षेपकांवर ही क्षेपणास्त्रs लादलेली दिसून आली. चीनने आपली क्षेपणास्त्रs आणि त्याच्याशी निगडित लष्करी उपकरणांसाठी एक स्वतंत्र रॉकेट फोर्स उभारले आहे. या सरावात भाग घेणाऱया चिनी जवानांनी वेगवेगळ्या युद्ध स्थिती, रासायनिक/जैविक हल्ला, उपग्रहीय हेरगिरीच्या प्रयत्नांचा सामना करणे आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगच्या स्थितीत कोणती रणनीति अवलंबिली जावी, याचा देखील अभ्यास करण्यात आला.

गंभीर आव्हान

सप्टेंबर 2015 मध्ये बीजिंगमध्ये आयोजित एका लष्करी परेडमध्ये पहिल्यांदा हे क्षेपणास्त्र दाखविले गेले होते. यानंतर जुलै 2016 मध्ये एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात केंद्रीय लष्करी आयोगाच्या उपाध्यक्षांना डी-16 युनिटचे निरीक्षण करताना दाखविण्यात आले होते. यात हे क्षेपणास्त्र देखील दिसून आले होते. चीनच्या सरकारने आपल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा तपशील कधीच उघड केला नाही. परंतु डी-16 क्षेपणास्त्र फर्स्ट आयलँडमध्ये तैनात इतर देशांच्या लष्करांसाठी एक गंभीर आव्हान आहे. जपानपासून उत्तेरत तैवान आणि दक्षिणेत फिलीपाईन्सपर्यंत फैलावलेल्या या बेटसमूहाला चीनचे लष्कर ‘फर्स्ट आयलँड चेन’ या नावाने संबोधिते.

ट्रम्पमुळे आक्रमक धोरण

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून चीन सातत्याने तैवानबाबत आक्रमकता दाखवत आहे. तैवानच्या अध्यक्षांसोबत ट्रम्प यांच्या संभाषणानंतर चीनने आक्रमक धोरण अवलंबिले आहे. ट्रम्प यांच्या या संभाषणावर आक्षेप घेत चीनने आपली विमानवाहू युद्धनौका तैवानच्या नजीक तैनात केली होती. त्याचबरोबर चीनने आपले लढाऊ विमान प्रशांत महासागरात स्थित फर्स्ट आयलँड चेन क्षेत्रात पाठविले. याशिवाय चीनने वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात देखील नौदल अभ्यास केला.

 

क्षेपणास्त्रांचे अमेरिका लक्ष्य

चीनने रशियासोबत लागून असलेल्या आपल्या सीमेनजीक एक दीर्घ मारकक्षमतेचे क्षेपणास्त्र तैनात केले आहे. या क्षेपणास्त्राचे लक्ष्य अमेरिकेच्या दिशेने असल्याचे रशियन प्रसारमाध्यमाकडून सांगण्यात आले. चीनच्या अधिकृत माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार चीन अमेरिकेसोबत संभाव्य लष्करी संघर्षाची तयारी गतिमान करत आहे.

Related posts: