|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भाषणाचे लाइव्ह स्ट्रीमिंग केल्याने आमदार निलंबित

भाषणाचे लाइव्ह स्ट्रीमिंग केल्याने आमदार निलंबित 

गुवाहाटी :

 आसामच्या एआययूडीएफचे आमदार अमिनुल इस्लाम यांना विधानसभेतील आपल्या भाषणाचे सोशल मीडियावर लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई आसाम विधानसभेचे प्रवक्ते हितेंद्र नाथ गोस्वामी यांच्या शिफारसीवर झाली आहे. इस्लाम यांचे निलंबन 3 दिवसांसाठी झाले आहे. त्यांनी शुक्रवारी विधानसभेत दिलेल्या आपल्या भाषणाचे सोशल मीडियावर लाइव्ह स्ट्रीमिंग केले होते. अमीनुल यांनी आपली चूक मान्य केली. परंतु त्यांनी जनहितात विधानसभेच्या कामकाजाच्या प्रसारणच्या नियमांमध्ये बदल व्हावेत असे म्हटले. त्यांनी विधानसभेत अवैध प्रवासींच्या वादग्रस्त मुद्यावर भाषण केले होते. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत, त्यामुळे जनतेला सभागृहातील आमच्या कृतींची माहिती व्हावी याकरता विधानसभेच्या पूर्ण कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी त्यांनी सभापतींकडे लेखी माफी मागितली आहे.