|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पठाणकोट सीमेनजीक पाक घुसखोराला कंठस्नान

पठाणकोट सीमेनजीक पाक घुसखोराला कंठस्नान 

पठाणकोट :

बामियाल या सीमाक्षेत्रात दक्ष असणाऱया बीएसएफ जवानांकडून पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान घालण्यात आले आहे. पंजाबच्या पठाणकोट येथे स्थित बामियालमध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर मंगळवारी बीएसएफने ही कारवाई केली. मागील वर्षी पठाणकोट हवाई तळावर हल्ला करणारे दहशतवादी याच मार्गाने भारतात शिरले होते. मंगळवारी सकाळी 8.15 वाजता आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या कुंपणापासून 50 मीटरच्या अंतरावर संशयास्पद हालचाली अधिकाऱयांना दिसून आल्या. जवानांनी घुसखोराला आव्हान दिले परंतु कोणतीही प्रतिक्रिया न मिळाल्याने त्यांनी गोळीबार सुरू केला, यात घुसखोराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मागील वर्षी पठाणकोट हवाईतळाला लक्ष्य बनविण्यासाठी दहशतवादी जेथून घुसले होते तेथेच घडली आहे. पठाणकोटच्या बामियाल क्षेत्रात बीएसएफच्या सिंबल सीमा चौकीनजीक ही चकमक उडाली. या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात दलदल असल्याचे सांगण्यात आले.