|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लोरे येथील घरफोडीत 15 हजाराचे दागिने चोरीस

लोरे येथील घरफोडीत 15 हजाराचे दागिने चोरीस 

कणकवली : लोरे नं. 1 – माळवाडी येथील चंद्रशेखर दशरथ रावराणे (30) यांचे बंद घर अज्ञात चोरटय़ाने फोडले. ही घटना मंगळवारी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. 15 हजार 40 रुपयांचे चांदीचे दागिने चोरीस गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर हे परिसरातील दुकानात कामाला जातात. त्यांच्या आई काही दिवसांसाठी बाहेरगावी गेल्या आहेत. मंगळवारी सकाळी 10 वाजता चंद्रशेखर हे कामावर निघून गेले. दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास ते घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा तोडलेल्या स्थितीत दिसला. चंद्रशेखर यांनी आत जाऊन पाहिले असता बेडरुममधील कपाट फोडलेले असल्याचे आढळले. चोरटय़ांनी कपाटतील ड्रॉवर फोडले होते. तसेच कपाटातील सर्व सामान विस्कटले होते.

त्यांनी पाहणी केली असता कपाटातील चांदीचे दागिने चोरीस गेले होते. यामध्ये 10 हजार 240 रुपयांचे प्रत्येकी 40 ग्रॅमचे चांदीचे 8 कमरपट्टे, चार हजार 800 रुपयांचे प्रत्येकी 30 ग्रॅमचे चांदीच्या वाळय़ांचे पाच जोड यांचा समावेश आहे. चंद्रशेखर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपास फोंडाघाट दूरक्षेत्राचे हवालदार भगवान नागरगोजे करीत आहेत.

Related posts: