|Monday, August 19, 2019
You are here: Home » Top News » मिरजेत एटीएमसाठीची 30 लाख रूपयांची रोकड लुटली

मिरजेत एटीएमसाठीची 30 लाख रूपयांची रोकड लुटली 

ऑनलाईन टीम / सांगली :

मिरजेतील गजबजलेल्या भागातून चोरटय़ांनी बुधवारी दुपारी तब्बल 30 लाख रूपयांची रोकड लुटली आहे. एटीएमध्ये भरण्यासाठी ही रोकड आणण्यात आली rहोती. दिवसाढवळय़ा घडलेल्या या प्रकारामुळे मिरज शहरात खळबळ उडाली असून शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीच्या बोलेरे गाडीतुन ही रोकड आणण्यात आली होती. मिरजेतील सतार मेकर गल्लीतील एसबीआयच्या एटीएममध्ये रोकड भरण्याचे काम सुरू असतानाच तिथेच बाहेर उभ्या असलेल्या गाडीच्या काचेचा दरवाजा फोडून चोरटय़ांनी आतील रक्कत पळवून नेली. गाडीमध्ये 30 लाख रूपयांची रोकड होती. ती सर्व चोरटय़ांनी पळवली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकारानंतर शहरात नाकाबंदी करण्यात आली असून, बाहेर जाणाऱया सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.