|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » लव्ह जिहाद अजूनही मुद्दा : आदित्यनाथ

लव्ह जिहाद अजूनही मुद्दा : आदित्यनाथ 

सत्तेत आल्यास रोमिओविरोधी पथक स्थापणार

वृत्तसंस्था/ लखनौ

लव्ह जिहाद आजच्या स्थितीत देखील मुद्दा आहे. आम्ही पश्चिम उत्तरप्रदेशला काश्मीर बनू देणार नाही. जर आमचे सरकार सत्तेत आले तर आम्ही रोमिओविरोधी पथके बनवू असा दावा भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार योगी आदित्यनाथ यांनी केला. आम्ही राज्यात शोषणाविरोधात आवाज उठविला तर आम्हाला सांप्रदायिक ठरविले जाते, एका विशेष समुदायावर अत्याचार घडविणारा हा कसला धर्मनिरपेक्ष नियम असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

उत्तरप्रदेश देशातील सर्वात मोठे राज्य आहे. देशाची 20 टक्के लोकसंख्या उत्तरप्रदेशात असून याला सुरक्षित आणि विकसित करण्यासाठी भाजपलाच सत्तेत आणावे लागेल. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो, तेथील लोक सांप्रदायिक लोकांपासून धोका असल्याचे सांगतात. सप-बसपच्या सरकारांमुळे राज्यातील शेतकऱयांना आत्महत्या करावी लागली. हत्या, लूट आणि बलात्काराच्या प्रकरणांमध्ये राज्य सरकारने कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप त्यांनी केला. शेतकऱयांना अनेक सुविधा देऊन त्यांना बळकट केली जाईल असे त्यांनी म्हटले.

प.उत्तरप्रदेशात लोकांचे पलायन

काही लोकांना वाचविण्यासाठी पश्चिम उत्तरप्रदेशात सामान्य लोक पलायन करण्यास विवश झाले आहेत. आम्ही हे पलायन रोखण्याचे काम करू. अवैध कत्तलखाने बंद करण्यासाठी एनजीटीने अनेकवेळा निर्देश दिले आहेत, परंतु सप सरकार भ्रष्टाचारामुळे कोणतीही कारवाई करत नाही. आम्ही या समस्या दूर करू. शेतकरी आणि गरीबांना मोफत शिक्षण तसेच आरोग्यासाठी काम केले जाईल असे आश्वासन आदित्यनाथ यांनी दिले. कैराना येथील विशिष्ट समुदायाच्या गुंडांमुळे कथित हिंदूंच्या पलायनाचा मुद्दा भाजपने या निवडणुकीत लावून धरला आहे.

 

Related posts: