|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पालिका प्रशासनापुढे 9 कोटी कर वसुल करण्यांचे आव्हान

पालिका प्रशासनापुढे 9 कोटी कर वसुल करण्यांचे आव्हान 

पंढरपूर / प्रतिनिधी

पंढरपूर शहरातील मालमत्ता धारक यांचा कर आणि झोपडपटटी धारक यांचा पालिकेकडे येणारा कर हा मार्च अखेरमुळे गोळा करण्यांची तयारी सुरू झाली आहे. यामधे सध्या शहरातून पालिकेला सुमारे 9 कोटी रूपयांचा कर वसुल करण्यांचे आव्हान आहे. यासाठी लवकरचं पालिकेची पथकेही तयार होउन करवसुलीसाठी शहरांमधे कार्यन्वित होणार आहेत.

    शहरांतील पाणीपुरवठा तसेच घरपटटी एकंदरीतच मालमत्ता करांची रक्कम ही शंभर टक्के वसुल करण्यांचे नगरपरिषदांना शासनाचे आदेश आहे. या आदेशांचींच अंमबजावणी करण्यासाठी प्रतिवर्षी मार्च अखेरच्या दरम्यान मोठया प्रमाणावर करवसुली ही होत असते. मात्र यामधे करवसुलीची आकडेवारी ही मोठी असते. यंदा एकूण करांपैकी 9 कोटी कर वसुल होणे शिल्लक आहे. साधारणपणे शहरातील एकंदरीतच सर्व कर हा 20 कोटींच्या आसपास आहे. यापैकी नउ कोटी वसुल करावयांचा आहे.

  यामधे शहरामधे एकूण 17 हजार मालमत्ता आहेत. यामधून एकूण 14 कोटी रूपयांची एकूण रक्कम आहे. यापैकी 6.50 कोटी रूपये येणे शिल्लक आहे. तर शहरांमधे 5024 झोपडया आहेत. यापैकीही 2 कोटी 84 लाख रूपये येणे बाकी आहेत अशी मिळून सर्व रक्कम ही 9 कोटींच्या वर जात आहे.

  गतवर्षीच्या तुलनेत यंदाची ही करवसुलीची रक्कम ही कमी आहे. कारण मध्यंतरी मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. यामधे अनेक मालमत्ता धारकांनी आपल्या जुन्या नोटा या कर रूपाने पालिकेत भरल्या आणि याचवेळी मोठया प्रमाणावर पालिकेचा कर हा वसुल झाला. मालमत्ता धारकांच्या एकूण करांपैकी सुमारे 55 टक्यांहून अधिक कर हा नोटाबंदीच्या दरम्यांनच वसुल झाला. त्यामुळे आता मालमत्ता धारकांकडून येणारी रक्कम ही अत्यल्प आहे. यामधे सुमारे 14 कोटीमधील 6 कोटी रक्कम ही वसुल करावयांची आहे. आणि त्यांसाठीच सध्या पालिका प्रशासन हे संपूर्णपणे कामाला लागलेले दिसून आले आहे.

सध्या कर वसुलीसाठी पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या सुचनेनुसार कर निरिक्षक सुनील वाळूजकर यांनी धडक वसुली मोहीम राबवून जप्तींची कारवाई करण्यात येणार आहे. करवसुलीसाठी वृत्तपत्रांत मालमत्ता धारकांची नावे प्रसिध्द केली जाणार आहेत. शिवाय सदरच्या मालमत्ता धारकांच्या घरांसमोर मोठया प्रमाणावर स्पिकरच्या माध्यमातून त्यांचे शिल्लक करांची रक्कमेची वारंवार घोषणा करण्यात येणार आहेत. तरी देखिल मालमत्ता धारकांनी आपला कर पालिकेकडे भरला नाही तर पालिकेकडून जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

Related posts: