|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जातो माघारी पंढरीनाथा..

जातो माघारी पंढरीनाथा.. 

पंढरपूर / प्रतिनिधी

जातो माघारी पंढरीनाथा / तुझे दर्शन झाले आता

    सावळया विठठलांचे दर्शन करून आज लाखों भाविकांनी पंढरीचा निरोप घेतला. त्यामुळे दिवसभर एसटी बसस्थानक तसेच रेल्वे स्टेशन आणि खाजगी वाहनामुळे पंढरीतून बाहेर पडणारे रस्ते गर्दीनु फ्gढलून गेले होते. यामधेही बहुतांश नागरिकांनी मंगळवारी रात्रींच पंढरीचा निरोप घेतला होता. 

 एकादशीचा उपवास आज व्दादशीदिवशी गोडाधोडाने सोडून भाविक पंढरीमधून परतीच्या प्रवासाला पहाटेपासूनच लागले होते. पंढरपूरातून परतताना भाविकांना चंद्रभागेचे स्नान आणि नामदेव पायरीचे दर्शन आणि विठठलांचे शिखर दर्शन घेउन पंढरीचा निरोप घेत होता.

  पंढरीतून भाविक परतत असताना मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी पहाटेपर्यत मुख्यबसस्थानकांवर मोठया प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती. साधारणपणे सकाळी दहाच्या सुमारास मोठया प्रमाणावरील शहरातील भाविकांची गर्दी कमी झाली होती. 

  विठठलांची पदस्पर्श दर्शन रांग आज अगदी विप्रदत्त घाटाजवळ जाउन पोहोचली होती. त्यामुळे विठठलदर्शनासाठी साधारणपणे 6 ते 7 तासांचा कालावधी लागत होता. तर मुखदर्शन अवघ्या एका तासांच्या आतमधे देखिल होताना दिसून आले. त्यामुळे विकेंड पकडून आलेले भाविक देखिल संध्याकाळच्याच सुमारास परतीच्या मार्गावर असलेले दिसून आले. आणि यातूनच पंढरी नगरीही भाविकांविना ओस पडलेले दिसून येण्यास सुरूवात झाली होती.

   पंढरीमधून परतीच्या मार्गावर जाण्यासाठी दिवसभर रेल्वे स्टेशनवर मोठया संख्येने भाविकांची गर्दी दिसून आली. यातूनही मिरज आणि कुर्डेवाडीकडे जाणा-या भाविकांची ओढा मोठया प्रमाणावर दिसून आला आहे.

  वारीसाठी शहरामधे मोठया प्रमाणावर खाजगी वाहनाने भाविक दाखल झाले होते. सदरच्या भाविकांनी देखिल मोठया प्रमाणावर पंढरपूरातून मंगळवारी दुपारनंतरच मोठया प्रमाणावर बाहेर पडण्यास सुरूवात झाली होती. यामधेही बुधवारी पहाटेही शहरातील 80 टक्यांहून अधिक वाहने मोठया प्रमाणावर बाहेर पडली होती. 

   व्दादशीदिवशी जरी बहुंतांश भाविकांनी पंढरपूरातून निरोप घेतला असला तरी शिल्लक असणा-या भाविकांनी आज मोठया प्रमाणावर चंद्रभागा वाळवंट , विष्णुपद , गोपाळपूर , कैकाडी महाराज मठ , संत तनपुरे महाराज मठ , संत गजानन महाराज मठ आदि मठांना भेटी देत मोठया प्रमाणावर गर्दी केली होती.

सद्य स्थितीला पंढरपूर शहरात सुमारे 70 हजारांच्या आसपास भाविक अजूनही शिल्लक आहे. सदरचे भाविक आज व्दादशीचा सोहळा करून रात्री उशीरांने मोठया प्रमाणावर बाहेर पडतील असा अंदाज आहे. कारण परंपरागत असणारे वारकरी हे बुधवारी पंढरी नगरी सोडत नाहीत. त्यामुळे सदरचे वारकरी हे रात्री बारांच्या नंतर पंढरपूर सोउतील.

 

Related posts: