|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दारूडय़ा मुलाकडून संपूर्ण कुंटुंबच संपविण्याचा प्रयत्न

दारूडय़ा मुलाकडून संपूर्ण कुंटुंबच संपविण्याचा प्रयत्न 

प्रतिनिधी /सोलापूर :

घरातील कलाहातून दारूच्या नशेत तरूणांने संपूर्ण कुंटुंबालाच संपवून स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कुंटुंबातील अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार कोरफळे ता. बार्शी येथे बुधवारी मध्यरात्री घडला. या प्रकाराने संपूर्ण जिल्हय़ात हळहळ व्यक्त होत आहे.

अनिरूध्द व्यंकट बरडे वय 45 रा. कोरफळे ता. बार्शी असे आरोपीचे नाव आहे. तर आई सखुबाई व्यंकट बरडे वय 60 व मुलगा सुदर्शन अनिरूध्द बरडे  वय 13 या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पत्नी रेश्मा अनिरूध्द बरडे वय 35, मुलगा अविनाश अनिरूध्द बरडे वय 10 आणि मुलगी प्रतिक्षा अनिरूध्द बरडे वय 11 हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सोलापूर, बार्शी आणि उस्मानाबाद येथील रूग्णालयात उपचारासाठी हालविण्यात आले आहे.

याबाबत वैराग पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, व्यंकटराव बरडे हे आपल्या कुंटुंबासह कोरफळे येथे राहण्यास आहेत. त्यांचा मुलगा अनिरूध्द  यास दारूचे व्यसन होते. यातून गेल्या काही महिन्यापासून घरात कलह निर्माण झाला होता. बुधवारी रात्रीही तो दारू पिऊन आला होता. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास अनिरूध्द यांने घरात झोपेत असलेल्या आई सखुबाई बरडे आणि मुलगा सुदर्शन बरडे याच्या डोक्यात लोखंडी हातोडय़ाने जोरदार प्रहार केला. यामध्ये दोघांच्याही डोक्यांचा चेंदामेदा होऊन रक्तस्त्राव मोठय़ा प्रमाणात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अनिरूध्दने आपला मोर्चा दुसरा मुलगा अविनाश आणि मुलगी प्रतिक्षा यांच्याकडे वळविला यांच्या डोक्यावरही कुकरीने जोरदार हल्ले केले. मुलांच्या आराडा सुरू झाल्याने जागे झालेली पत्नी रेश्मा त्यांना वाचविण्यासाठी मध्ये आली असता तीच्याही पोटात कुकरी खुपसली. यानंतर जखमी झालेल्या पत्नी रेश्मा हीच्या अंगावर रॉकेल ओतून तीला पेटवून दिले.

Related posts: