|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिपाई ‘लाचलुचपत’च्या जाळय़ात

शिपाई ‘लाचलुचपत’च्या जाळय़ात 

प्रतिनिधी /विटा :

हक्कसोडपत्राची नक्कल देण्यासाठी 300 रूपयांची लाच घेताना विटा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील शिपाई धनंजय शिवाजी देवकर वय 47 रा.अपूर्वा रेसीडेन्सी एस.2,सुतार गल्ली पाटणे बिल्डींगजवळ खणभाग सांगली,मुळ गाव राजेवाडी ता. आटपाडी याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याच्यावर विटा पोलिसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

विटा येथील एकाने आपल्या आजोबांच्या नावाने 1962 मध्ये केलेले ताबे गहाण व 2001 मध्ये आत्यांचे केलेले हक्कसोडपत्र या दोन दस्तांची नक्कल मागणी केली होती. दुय्यम नोंदणी निबंधक विटा श्रेणी एक यांच्याकडे त्यांनी रितसर अर्जही केला होता. त्यापैकी आजोबांचे ताबे गहाण शोधून ठेवतो.पण आत्यांच्या हक्कसोडपत्रसाठी 300 रूपये देण्याची मागणी शिपाई देवकर याने केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपतच्या सांगली कार्यालयाशी संपर्क साधला. लाचलुचपत विभागाने सापळा लावून गुरूवारी दुपारीच त्याला रंगेहाथ पकडले. कोणीही शासकीय नोकर शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेऊन कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही लाचलुचपत विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

 

Related posts: