|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » खलाटी ग्रामपंचायतीच्या विविध कामात 23 लाखांचा अपहार

खलाटी ग्रामपंचायतीच्या विविध कामात 23 लाखांचा अपहार 

प्रतिनिधी /जत :

जत तालुकयातील खलाटी ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाच्या राबवण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांमध्ये सुमारे 23 लाख 65 हजार 221 रूपयांचा अपहार झाल्याची फिर्याद गुरूवारी जत पोलीसांत दाखल झाली आहे. तालुकयातील मनरेगा घोटाळय़ा पाठोपाठ आता ग्रामपंचायतींच्या कामातील गैरव्यवहारही चव्हाटय़ावर येत आहे. यामुळे तालुकयात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तत्कालीन मयत ग्रामसेवकासह दोन माजी व एका विदय़मान सरपंचावर 420 चा गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहीती अशी, तालुकयातील खलाटी ग्रामपंचायतीच्या वतीने सन 2012 ते 2016 अखेर शासनाच्या विविध योजना राबवण्यात आल्या आहेत. यात  ग्राम पर्यावरण समृध्दी योजना, मनरेगा, ग्रामीण पाणी पुरवठा, दलितवस्ती सुधार योजना, तेरावा व चौदावा वित्त आयोग अशा योजना राबवण्यात आल्या होत्या. या योजना राबवताना आलेल्या निधीत ग्रामसेवक, सरपंच यांनी संगणमतांनी सुमारे 23 लाख 65 हजार 221 रूपयांच्या निधीचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.

येथील कामासंदर्भात अनेक तक्रारी पंचायत समिती प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. त्यानुसार पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱयांनी याची चौकशी केली होती. या चौकशीत खलाटीत ज्या योजना राबवल्या गेल्या, त्यातील कांही रक्कमा ग्रामसेवक नामदेवर महारनूर, माजी सरपंच चंद्रकांत आडगळे, भागिरथी चव्हाण आणि विदय़मान सरपंच संगीता कोळी यांनी संगणमतांनी काढल्या आहेत. या रक्कमा काढताना रोखीने व चेकेने काढल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे.

Related posts: