|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » 30 लाख लंपास करणारे आरोपी परराज्यातील

30 लाख लंपास करणारे आरोपी परराज्यातील 

प्रतिनिधी /मिरज :

शहरातील स्टेट बँकेच्या एटीएम समोरुन बुलेरो गाडीच्या काचा फोडून त्यातील 30 लाख रुपये असलेली बॅग लंपास करणारे आरोपी हे स्थानिक नसून, परराज्यातील असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यांनी बरेच दिवस पाळत ठेवून हा प्रकार केला असून, ते लवकरच पोलिसांच्या हाती लागतील, असा विश्वास एका जबाबदार पोलिस अधिकाऱयाने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

बुधवारी दुपारी शहरातील शनिवार पेठेत सराफ रोडवर कापसे हाईटस् येथे असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएममध्ये दहा लाख रुपयांची पॅश भरत असताना समोरच लावलेल्या बुरेलो गाडीतील 30 लाख रुपयांची रोकड दोन अज्ञात चोरटय़ांनी क्षणाचाही विलंब न लावता, दिवसाढवळ्या मध्यवर्ती ठिकाणाहून लंपास केली आहे. वर्दळीच्या ठिकाणी असा प्रकार घडल्याने जिह्याच्या पोलिस यंत्रणसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. बुलेरो गाडी थांबल्यानंतर अवघ्या एक-दोन मिनीटात आरोपींनी चालकाच्या मागील बाजूची काच फोडून आतील बॅग मोटारसायकलीवरुन लंपास केली. सदरचा प्रकार समोरच असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्हीत कैदही झाला आहे.

सदरच्या घटनेतील दोन्ही आरोपींचे चेहरे पोलिसांनी तपासले असून, सदरचे आरोपी स्थानिक नसून, परराज्यातील असल्याचा त्यांचा संशय बळावला आहे. गेली अनेक दिवस त्यांनी सदर गाडीवर पाळत ठेवून संधी उपलब्ध झाल्यानंतर हा प्रकार केला आहे. पण ते लवकरच पोलिसांच्या हाती लागतील, असा विश्वास एका अधिकाऱयाने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आरोपींच्या शोधासाठी पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जबाबदार अधिकाऱयांना काही महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. त्यासाठी काही पथकेही नियुक्त केली आहेत. अशा स्वरुपाच्या चोऱया करणाऱया रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडेही कसोशीने चौकशी सुरू झाली आहे. सीसीटीव्हीतील आरोपींच्या चेहऱयावरुन ते परराज्यातील असल्याचा संशय बळावला आहे. त्यादृष्टीनेही काही पथके रवाना करण्यात आली आहेत.

Related posts: