|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तासगावात पाईप लाईन फुटून लिकेज

तासगावात पाईप लाईन फुटून लिकेज 

प्रतिनिधी /तासगाव :

गेली 86 दिवस सुमारे तीन महिने बंद असलेली मणेराजुरी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सुरु होते न होते तोच या योजनेच्या पाईपला तासगावात मोठे लिकेज झाले. या लिकेजमुळे प्रमुख मार्गावर सुमारे एक तास, सुमारे 75 फूटाचा पाण्याचा फवारा नागरिकांना पाहवयास मिळाला काही वाहन चालकांनी या पाण्याच्या फवाऱयात आपली वाहने धुवून घेतली, दुचाकी वाहन चालकांना कसरत करत या फवाऱयातून भिजत मार्गस्थ व्हावे लागले, तर अनेकांना मार्ग बदलावा लागला. कालबाह्य झालेल्या या पाईप लाईनची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी होत आहे.

तासगाव तालुक्यातील मणेराजुरी सह विविध गावांना उपयोगी पडणारी मणेराजुरी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना 15 नोव्हेंबर पासून बंद होती ही योजना 8 फेब्रुवारी रोजी सुरु झाली आणि तासगाव येथून जाणाऱया या योजनेच्या पाईपला तासगाव कॉलेज नजीकच्या बायपास रस्त्याजवळ गुरुवारी दुपारी 12 च्या दरम्यान मोठे लिकेज झाले.

हे लिकेज इतके मोठे होते की, या पाईप मधून बाहेर पडणारा पाण्याचा फवारा सुमारे 75 फूट अंतरापर्यंत गेला होता. हा पाण्याचा कचरा इतका मोठा होता की, या फवाऱयाने तासगाव कॉलेज पासून जाणारा प्रमुख मार्ग व्यापला होता. या प्रमुख मार्गावरुन सारख्या मोठय़ा वाहनांसह चारचाकी व दुचाकी वाहनांची अधिक वर्दळ असते. काही दुचाकी वाहन चालकांना व पायी चालत जाणाऱया नागरिकांना वीज वितरण कार्यालयासह अन्य ठिकाणी जाताना ट्रक्टर मधील ऊस तोड मजुरांना भिजत जावे लागले. तर काहींनी हा मार्ग बदलून अन्य मार्गाने जाणे पसंद केले. काही तरुणांनी भर उन्हात या पाण्यात भिजून आनंद लुटला.

Related posts: