|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विस्थापितांच बंड प्रस्थापितांना थंड करणार : मुख्यमंत्री

विस्थापितांच बंड प्रस्थापितांना थंड करणार : मुख्यमंत्री 

वेळापूर / प्रतिनिधी :

सोलापूर जिल्हयातील काही नेत्यांनी मोठया प्रमाणावर सहकारांवर कब्जा करून सहकारांवर अंकुश ठेवण्यांचे काम केले आहे. याच प्रस्थापितांना थंड करण्यासाठी विस्थापितांचे मोठे बंड जिल्हा परिषदेंवर झेंडा फ्ढडकवल्याशिवाय राहणार नसल्यांचे प्रतिपादन राज्यांचे मुख्यमंत्री देंवेंद्र फ्ढडणवीस यांनी केले आहे.

  वेळापूर येथे शेतकरी साखर कारखान्यांचे चेअरमन उत्तमराव जानकर यांनी आज असंख्य कार्यकर्त्यासह भाजपामधे प्रवेश केला . यावेळी आयोजित मेळाव्यामधे ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील , सहकारमंत्री सुभाष देशमुख , आ.प्रशांत परिचारक , संजयमामा शिंदे , रंजनभाउ गिरमे , जिल्हाध्यक्ष शहाजी पवार , पंचायत समितीच्या सभापती रूपालीताई बेंदगुंडे रिपाईचे विकास धाइंजे , नरेंद्र भोसले आदि यावेळी उपस्थित होते.

   याप्रसंगी पुढे बोलताना मुख्यमंत्री फ्ढडणवीस म्हणाले , या जिल्हयामधील अनेक कारखानदारांनी एफ्ढआरपींची रक्मकम दिली नाही. काहींनी तर मोठया प्रमाणवर शेतक-यांला मोठे करण्यापेक्षा सहकारांच्या माध्यमातून स्वतःच्या संस्था आणि कुंटुबिय यांना मोठे केले. मात्र या जिल्हयातील शेतक-यांचा पैसा हा संपूर्णपणे भाजपा सरकार वसुल करून देईन. यासाठी वेळप्रसंगी दंडुका घ्यावा लागला तरी चालेल. पण हे सरकार शेतक-यांच्या सोबतच राहणार असल्यांचे त्यांनी योवळी सांगितले.

   शेतक-यांच्या प्रश्नावर बोलता असताना मुख्यमंत्री फ्ढडणवीस पुढे म्हणाले , जिल्हा बॅक सक्षम असली . की शेतक-यांचा विकास होतो. मात्र जिल्हा बॅक ही मृत पावली. तर त्यांच्या पाठोपाठ शेतकरी ही मृत पावत असल्यांचे त्यांनी सांगत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेंची अवस्था सांगितली. आणि त्यापुढे जाउन सदरची बॅक ही सुधारण्यासाठी देखिल पाउल टाकण्यांची वेळ आली असल्यांचे त्यांनी सांगितले. आहे.

    याप्रसंगी मुख्यमंत्री यांनी सध्या सोलापूर †िजल्हयात सर्वाधिक शेततळी झाली आहेत. शिवाय येथे मोठया प्रमाणावर शासकीय योजनेतून रूग्णावर उपचार देखिल झाले आहेत. यामधे सुमारे 35 हजार रूग्णाचा समावेश असल्यांचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. आणि यापुढे हा जिल्हा स्वयंपूर्ण करण्यासाठी आणिद येथील शेतक-यांच्या हक्कांसाठीही लढणार असल्यांचे त्यांनी सांगितले .

Related posts: