|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » उद्धव ठाकरेंनी केले काँग्रेसचे कौतुक

उद्धव ठाकरेंनी केले काँग्रेसचे कौतुक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी असूनही दररोज मोदी सरकारच्या कारभारवर टीका करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लक्ष्य करण्याच्या नादात काँग्रेसचे गुणगान केले आहे. देशाची प्रगती मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून मागच्या दोन वर्षात झालेली नाही. असा टोला त्यांनी भाजपला लावला.

आजचा देश हा आधीच्या राजकर्त्यांनीच उभा केला. त्यांनी कदाचित काही चुका किंवा घोटाळे केले असतील, नव्हे ते केले आहेतच, पण असे अनेक सखाराम नंतर भाजपाच्या गंगेत पावन करून घेतले गेलेच ना? असे उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. काँग्रेसने चोऱयामाऱया करूनच राज्य कारभार केला हे मान्य केले तरी ज्या देशात स्वतंत्र्याच्या वेळी सुईदेखील बनत नव्हती तो देश आज अर्थिक व औद्योगिक बाबतीत खूपच पुढे गेला आहे. असे अग्रलेखात लिहले आहे. 280 खासदारांचे बहुमत असलेल्या भाजप सरकारने केल्या अडिच वर्षात देशात नक्की कोणते परिवर्तन घडवून आणले? असा सवाल त्यांनी विचारला.

Related posts: