|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » माधुरी बनली वरूण – आलियाची डान्सगुरू

माधुरी बनली वरूण – आलियाची डान्सगुरू 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

धकधक गर्ल माधुरी दिक्षितने वरूण-आलियाला ‘तम्मातम्मा 2’ हे गाणे आखेर सोशल मिडीयावर रिलिज करण्यात केले आहे. काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षितने ‘तम्मातम्मा 2’ गाणे तुमच्या भेटीला घेऊन येत आहे, असे सोशल मिडयाच्या मार्फत सांगितले. त्यानुसार शनिवारी ‘तम्मातम्मा 2’ हे गाणे प्रसिध्द करण्यात आले यामध्ये माधुरी आलिया आणि वरूण धवनला तम्मातम्मा गाण्यावरील स्टेप्स शिकवत असल्यचे दिसत आहे.

एकुणच काही मिनिटांसाठी माधुरी या दोघांच्या डान्सगुरूच्या भूमिकेत होती. माधुरीसोबत धम्मालमस्ती केलेला व्हिडिओ वरूणने सोशल मिडीयावर चाहत्यांसबोत शेअरही केला आहे. 1989 साली आलेला ‘थानेदार’या सिनेमातील तम्मातम्मा हे मुळ गाणे असून ‘बदीनाथ की दुल्हनिया’ सिनेमाच्या माध्यमातून आलिया- वरूण हे गाणे पुन्हा एकदा सिनेरसिकांच्या भेटीला घेऊन आले आहेत.