|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Top News » कोहलीचे द्विशतक, डॉन ब्रॅडमनलाही टाकले मागे

कोहलीचे द्विशतक, डॉन ब्रॅडमनलाही टाकले मागे 

ऑनलाईन टीम / हैद्राबाद :

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा कसोटीत उत्कृष्ट खेळाडू असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. शुक्रवारी बंगलादेश विरोधात सुरू असलेल्या पहिल्या कसोदीच्या दुसऱया दिवशी विराटने द्विशतक करून ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटवीर सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रम मोदीत काढत नवीन विक्रम प्रस्थापीत केले आहेत. विराट कोहलीने 243 चेंडूत 200 धावा केल्या आहेत.

या सामन्यात भारतीय संघाकडून अनेक विक्रम स्थापित करण्यात येत आहेत. कर्णधार विराट कोहलीने या द्विशतकसह सलग चार कसोटी मालिकेत चार द्विशतक बनविण्याचा नविन विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी हा विक्रम महान ब्रॅडमॅन आणि राहुल द्रविड यांच्या नावावर तीन तीन द्विशतक बनविण्याचा विक्रम होता. कोहली यांच्या विक्रमची एक विशेष बाब म्हणजे बांग्लादेशच्या विरोधातील पहिल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत त्याने द्विशतक ठोकले आहे. तसेच ही पाचवी वेळ आहे, जेव्हा विराट कोहलीने सलग शतक करून 150 धावांचा आकडा पार केला आहे.