|Sunday, August 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सेबी अध्यक्षपदी अजय त्यागी

सेबी अध्यक्षपदी अजय त्यागी 

नवी दिल्ली  /  वृत्तसंस्था

अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी अजय त्यागी यांची सेबीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. पुढील पाच वर्षांसाठी ते सेबीचे प्रमुखपद सांभाळणार आहेत. सध्याचे प्रमुख असणारे उपेंद्र कुमार सिन्हा हे 1 मार्च रोजी निवृत्त होणार आहेत. 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणारे त्यागी हे हिमाचल कॅडेरचे आहेत. सध्या ते आर्थिक व्यवहार विभागात अतिरिक्त सचिवपदावर (गुंतवणूक) कार्यरत आहेत. मूळचे उत्तर प्रदेशचे असणारे त्यागी हे भांडवली बाजारासह अन्य विषय हाताळतात. 58 वर्षीय त्यागी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. शेअरबाजारातील व्यवहार नजर ठेवण्याचे आणि गैरव्यवहारांना आळा घालण्याचे काम सेबी करते.