|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » काँग्रेसच्या जाहीरनाम्यात वचनपूर्ती बरोबरच आश्वासनांची खैरात

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात वचनपूर्ती बरोबरच आश्वासनांची खैरात 

सोलापूर / प्रतिनिधी

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यामध्ये गेल्या निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याबरोबर ‘वचनपुर्ती’ केल्याचे नमुद करण्यात आले आहे. तर पुढील पाच वर्षात करण्यात येणाऱया कामांच्या आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे.

काँग्रेसने प्रचाराचा शुभारंभ करण्याबेराबरच आपला जाहीरनामा प्रसिध्द करून प्रचारात आघाडी घेतली आहे. खासदार राजीव सातव यांच्या उपस्थित गुरूवारी रात्री उशिरा पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिध्द केला. यामध्ये ‘वचनपूर्ती’च्या शिर्षकाखाली गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा आढावाच देण्यात आला आहे. तर पुढील पाच वर्षात शहराच्या विकासाठी भावी योजनांची खैरात करण्यात आली आहे. गेल्या निवडणूकीत देण्यात आलेल्या आश्वासनांची पुर्तता गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात नेते सुशिलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शना करण्यात आली असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

वचनपूर्तीमध्ये 1551 कोटी तर भांडवली खर्चातून 1288 कोटी रूपयाची कामे करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये रस्ते विकास कामावर नगरोत्थान योजनेतून एक कोटी 15 हजार तर भांडवली निधितून 20 कोटी 50 लाख रूपयाची कामे करण्यात आली आहेत. शहरातील 81 किमीचे रस्ते करण्यात आले असून 90 कोटी रूपये खर्चाच्या मॉडेल रस्त्याची कामेही सुरू करण्यात आली आहेत. वित्त आयोगाच्या अनुदानातून् 100 कोटी रूपये खर्चकरून पाईलाईन  व टाकीचे कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तर 250 कोटी रूपयाची कामे प्रगती पथावर आहेत. डेनेज व्यवस्था करण्यात आली असून महापालिकेच्या भांडवली खर्चातून 20 कोटीची तर  सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून 110 कोटी 23 लाख 65 हजार 786 रूपयाची कामे करण्यात आली आहेत. दिवाबत्तीसाठी 13 कोटी रूपयाची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि सुखसोयीसाठी तब्बल 11 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.

महिला आणि बाल विकास योजनेतंर्गत 15 कोटी रूपये खर्च करून महिलांना विविध व्यावसायाचे मार्गदर्शन करून त्यांना व्यावसाय उभा करून देण्यात आला आहे. डॉ. व्दारकानाथ कोटणीस स्मारकासाठी सात कोटी 10 लाख रूपयाची तरतुद करण्यात आली आहे.  विडी घरकुल परिसरात पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नव्याने चार पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. यासह प्राणी संग्राहालय सुशोभिकरण, स्मशानभूमी सुधारणा, घनकचरा व्यावस्थापन याकामाबरोबरच आमदार प्रणिती शिंदे यांच्या विकास निधीतून 14 कोटीची कामे पुर्ण करण्यात आली असल्याचा वचनपूर्तीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

जाहीरनाम्यातील पुढील पाच वर्षाच्या काळात करण्यात येणाऱया योजना आणि कामामध्ये शहराला नियमित आणि सुरळीत प्रती माणसी 135 लिटर पाणी पुरवठा करणे, कर आकारणीमध्ये सुसुत्रीकरण आणणे, बांधकाम परवानासाठी एक खिडकी योजना, परिवहनचे योग्य नियोजन, प्रत्येक प्रभागात पार्किग झोन व मार्केट एरिया, महिलांच्यासाठी स्वच्छता गृहे आणि शौचलये, प्रत्येक प्रभागात वॉटर एटीएम, झोपडपटय़ांचा विकास, शहर स्वच्छ व कचरा मुक्त करणे, कचऱयापासून विजनिर्मिती, मीनी शॉपींग सेंटर, दिव्यांग व अपंगासाठी प्रशिक्षण केंद्रे, राष्ट्रीय खेळाडूंना नोकरी, क्रिडांगण व अधुनिक बागा, अभ्यासिका आणि व्यायाम शाळा, दवाखाने आणि शाळांचे योग्य नियोजन, महिलांच्यासाठी आरोग्य सुविधा, खोकेधारक आणि हातगाडीवाल्यांचे पुर्नवसन, झोपडपटीत दुमजी बाधकाम आदी कामांचे आश्वासन देण्यात आले आहे. याबरोबरच पाणी पट्टीत सुट व युजर चार्जेस माफ, उत्पन्न वाढीसाठी मिळकतीचा सर्व्हे, प्रभाग समिती व जनता दरबार, मोफत वायफाय, विद्यार्थ्यांच्यासाठी स्टडी सेंटर, उद्योगांना सवलती, विडी कामगार महिलांच्यासाठी  रोजगाराची उपलब्धता आणि शहरातील प्रत्येक चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आदी सोयी सवलीतचीही खैरात करण्यात आली आहे.

Related posts: