|Thursday, November 14, 2019
You are here: Home » leadingnews » उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात 

ऑनलाईन टीम / उत्तर प्रदेश :

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला शनिवारी सुरूवात झाली. उत्तर प्रदेशचे लोकसभेवर सर्वाधिक खासदार पाठविणारे राज्य असल्यामुळे या निवडणुकांकडे 2019 साली होणाऱया लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पहिले जात आहे.

या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. उत्तर प्रदेश्मध्ये 11 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतल 11 मार्चला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून यावेळी तब्बल 2.6 कोटी मतदार आपला कौल मतपेटीत टाकतील. 2013 मध्ये हिंसाचारात 65 लोकांचा झालेला मृत्यू आणि हिंदूधर्मीयांना निर्वासित करण्यात आल्याच्या आरोपांमुळे या भागातील अनेक मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. गेल्या दोन आठवडय़ात याठिकाणी सर्वच राजकिय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, बसपाच्या सर्वेसर्वा मायवती आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी अशा सर्व बडय़ा नेत्यांनी सभा घेतल्या आहेत. गेल्या अडीच वर्षातील केंद्र सरकारचा कारभार, नोटाबंदी, जातीय हिंसाचार, भाजप नेत्यांची प्रक्षोभक व्यक्तव्ये या पर्श्वभूमीवर याठिकाणचे मतदार काय कौल देणार, याची सगळय़ांना उत्सुकता आहे.

 

Related posts: