|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » पनीरसेल्वम यांना 10 खासदारांचा पाठिंबा ; शशिकला गटातून गळती सुरु

पनीरसेल्वम यांना 10 खासदारांचा पाठिंबा ; शशिकला गटातून गळती सुरु 

ऑनलाईन टीम / चेन्नई :

तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून नाटय़मय घडामोडी घडत असून यामध्ये शशिकला आणि पनीरसेल्वम यांच्यात सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. यातच शशिकला यांच्या गटातून गळती सुरु झाली असून अण्णा द्रमुक पक्षाचे 10 खासदार पनीरसेल्वम यांच्या गटात सामिल झाले आहेत.

तामिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम आणि अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस शशिकला यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी अटीतटीची लढाई सुरु आहे. दोघांनीही सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यातच पनीरसेल्वम यांचा गट शशिकला यांच्या गटापेक्षा सरस ठरत आहे. असे असताना लोकसभेचे 8 आणि राज्यसभेच्या 2 खासदारांनी पनीरसेल्वम यांना पाठिंबा दिला आहे. सेंगुत्तुवन, जयसिंह, लक्ष्मणन आणि आर. पी. मारुतराजा या सर्वांनी पनीरसेल्वम यांना समर्थन दिले.

तसेच पक्षाचे किमान 25 टक्के आमदार मंगळवारपर्यंत पनीरसेल्वम यांना समर्थन देण्याची शक्यता आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात नेमके काय चित्र असणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Related posts: