|Sunday, January 26, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » नव्या आर्थिक वर्षात केंद्राकडून 2.83 लाख नोकऱया

नव्या आर्थिक वर्षात केंद्राकडून 2.83 लाख नोकऱया 

नवी दिल्ली

केंद्र सरकार पुढील आर्थिक वर्षात 2.83 लाख नव्या नोकऱया तयार करणार आहे. 1 तारखेला अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात हा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात या नोकऱया निघतील असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्प दस्तऐवजानुसार 2016 साली केंद्रीय यंत्रणांमध्ये 32.84 लाख कर्मचारी कार्यरत होते. 2018 पर्यंत हा आकडा 35.67 लाख करण्याची योजना आहे. गृह मंत्र्घलयात 6076 आणखी कर्मचाऱयांची भरती होईल. 2018 पर्यंत मंत्रालयात एकूण कर्मचाऱयांचा आकडा 24778 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

याशिवाय पोलीस विभागांमध्येच 1.06 लाख कार्यदल वाढविण्याची योजना आहे. पुढील वर्षी पोलीस दलाची संख्या 1113689 होईल. 2016 च्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या अधीन काम करणाऱया पोलीस विभागांमध्ये 1007366 पोलीस कर्मचारी आहेत. अर्थसंकल्प दस्तऐवजानुसार विदेश मंत्रालयात सध्या 9294 कर्मचारी आहेत, पुढील आर्थिक वर्षात यात 2109 ने वाढ केली जाईल.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयात देखील 2018 पर्यत 2027 कर्मचाऱयांची भरती करण्याची योजना आहे. 2016 मध्ये या मंत्रालयात फक्त 53 कर्मचारी होते.

Related posts: