|Sunday, November 17, 2019
You are here: Home » leadingnews » काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिलह्यात झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. काश्मीरच्या यारापोरा भागात भारतीय लष्कर आणि दहशतवद्यांमध्ये चकमकसुरू आहे. या चकमकीत सैन्य दलाने चोख प्रत्यूत्तर देत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे, तर अन्य दोन जवान गंभीर जखमी आहेत. रविवारी सकाळी यारीपोरा येथे एका घरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सैन्यदलाला मिळाली होती. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी घराला चारही बांजूनी घेरले, त्यामुळे दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत चार दहशतवादी ठार झाल्यानंतरही अजून चकमक सुरू आहे. चकमक संपल्यानंतरच या घरात किती दहशतवादी लपून बसले होते हे स्पष्ट होईल . दहशतवाद्यांकडील शस्त्रे लष्कराने ताब्यात घेतली आहेत.

Related posts: