|Thursday, November 21, 2019
You are here: Home » Top News » व्यापम घोटाळा ; एमबीबीएसच्या 500 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द

व्यापम घोटाळा ; एमबीबीएसच्या 500 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मध्य प्रदेश राज्यातील सर्वात मोठा घोटाळा असलेला व्यापम अर्थात व्यावसायिक परीक्षा मंडळांतर्गत सन 2008 ते 2012 या दरम्यानच्या कालावधीत देण्यात आलेले पाचशेहून अधिक एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

व्यायम हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. या घोटाळ्यात अनेक बडय़ा नेत्यांची नावे समोर आली होती. तसेच या घोटाळ्याचे वार्तांकन करणाऱया अनेक पत्रकारांचा या प्रकरणात संशयास्पद मृत्यू झाला होता. याचबरोबर जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि एक महिला ट्रेनी कॉन्स्टेबल यांनी आत्महत्या केली होती. या घोटाळ्यातील मृतांचा आकडा 25 पर्यंत गेला. त्यानंतर एमबीबीएसच्या 500 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले.

Related posts: