|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दोन अपघातात तीन तरुण ठार

दोन अपघातात तीन तरुण ठार 

प्रतिनिधी/ बेळगाव

सोमवारी दोन ठिकाणी झालेल्या अपघातात तीन तरुण ठार झाले आहेत. बोडकेनहट्टीनजीक भरधाव टेम्पोने मोटारसायकलला ठोकरल्याने झालेल्या  अपघातात इनाम बडस येथील दोघा जणांचा मृत्यू झाला असून आणखी एक तरुण जखमी झाला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. तर भरधाव कारने मोटारसायकलला ठोकरल्याने नाथ पै नगर अनगोळ येथील एक तरुण जागीच ठार झाला. सोमवारी दुपारी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भुतरामहट्टीजवळ हा अपघात घडला.

बोडकेनहट्टीनजीक झालेल्या अपघातात जोतिबा कृष्णा हजगोळकर (वय 25), धाकलू मंगू पाटील (वय 24) दोघेही रा. इनाम बडस हे ठार झाले. तर त्याच गावातील यल्लाप्पा अर्जुन पाटील (वय 29) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

इनाम बडस येथील जोतिबा, धाकलू व अर्जुन हे तीन तरुण मोटार सायकलवरून जात होते. भरधाव टेम्पोची त्यांच्या मोटारसायकलला धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जोतिबाचा हॉस्पिटलमध्ये हलविताना वाटेतच मृत्यू झाला. रात्री उपचाराचा उपयोग न होता धाकलूचाही मृत्यू झाला. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.         

 भुतरामहट्टीजवळ झालेल्या अपघातात प्रवीण यल्लाप्पा कोटे (वय 28 रा. नाथ पै नगर, अनगोळ) हा जागीच ठार झाला आहे. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. एमएच 02 डीव्ही 9779 क्रमांकाच्या फॉर्च्युनर कारने केए 22 ईके 3401 क्रमांकाच्या मोटारसायकलला ठोकरल्याने हा अपघात घडला. प्रवीण हा आपल्या मोटारसायकलवरून बेळगावला येत होता. त्यावेळी मुंबईहून गोकर्णकडे जाणाऱया कारची मोटारसायकलला धडक बसली. या अपघातात प्रवीण याचा जागीच मृत्यू झाला. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.

Related posts: