|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मनपाचे अधिकारी संगणक सुविधेपासून वंचित

मनपाचे अधिकारी संगणक सुविधेपासून वंचित 

प्रतिनिधी / बेळगाव

महापालिकेच्यावतीने विविध योजनांतर्गत लाभार्थींना लॅपटॉपचे वितरण करण्यात येते. तसेच मनपा कार्यालयाचा कारभार इ-गव्हर्नन्स करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कार्यालयातील प्रमुख अधिकारी संगणक सुविधेच्या प्रतीक्षेत आहेत. संगणक किंवा लॅपटॉप सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करूनही याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली नसल्याने प्रमुख अधिकारी संगणकाच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रमुख अधिकारीच संगणक सुविधेपासून वंचित असल्याने महापालिकेचा कारभार संगणकीकृत कसा होणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. महापालिका कार्यालयातील प्रमुख अधिकाऱयांना संगणक हाताळण्यासाठी क्लार्कच्या जागेवर बसून कामकाज करावे लागते. यामुळे अधिकाऱयांना संगणकाचे शिक्षण केव्हा देणार असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. महापालिकेचा कारभार तसेच नागरी सुविधा संगणकीकृत करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. पण अद्यापही याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. महसूल विभाग, जन्म व मृत्यू दाखला, लेखा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच गरिबी निर्मूलन विभाग अशा सर्वच विभागांचा कारभार संगणकीकृत करण्यात आला आहे. मात्र याची माहिती प्रमुख अधिकाऱयांना नसते. संगणकीकृत करण्यात आलेली माहिती घेण्यासाठी वरि÷  अधिकाऱयांना कर्मचाऱयांवर अवलंबून राहावे लागत आहे. वास्तविक पाहता प्रत्येक विभाग प्रमुखासाठी स्वतंत्र संगणक उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. काही अधिकाऱयांवर विविध पदांचा कार्यभार सोपविण्यात आला असल्याने संगणक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पण याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळेच कार्यालयाचा कारभार संगणकीकृत होत नसल्याची टीका नागरिक करीत आहेत. लॅपटॉप किंवा संगणक उपलब्ध करून देण्याची मागणी आयुक्तांकडे करूनही याची दखल घेण्यात आली नाही. काही अधिकारी स्वत:चा टॅब्लेट आणि लॅपटॉपचा वापर कार्यालयीन कामासाठी करीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.     

Related posts: