|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मोर्चावेळी कार्यरत राहणार डॉक्टरांचे पथक

मोर्चावेळी कार्यरत राहणार डॉक्टरांचे पथक 

प्रतिनिधी/ बेळगाव

मोर्चाच्यावेळी आकस्मिक उपचाराची गरज पडल्यास मोर्चाच्यावेळी डॉक्टरांचे पथक त्वरीत धावून येणार आहे. मोर्चा काळात 7 ठिकाणी डॉक्टर कार्यरत असतील, अशी माहिती डॉक्टरांच्या बैठकीत देण्यात आली आहे.

सोमवारी तुकाराम बँकेच्या सभागृहात डॉक्टरांची बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व ठिकठिकाणी रुग्णवाहिका व डॉक्टरांचे पथक कार्यरत असेल अशी माहिती देण्यात आली. डॉक्टरांचे पथक पुढील ठिकाणी कार्यरत असेल.

@शिवाजी उद्यानजवळ डॉ. बामणे, डॉ. संदीप पाटील, डॉ. राम अनगोळकर हे कार्यरत असतील.

@यश हॉस्पिटल जवळ फिरती रुग्णवाहिका असेल. याठिकाणी डॉ. एस. के. पाटील व इतर डॉक्टरांचे पथक असेल.

@शनिमंदिर येथे डॉ. विलास तुक्कार, डॉ. संतोष पाटील, डॉ. श्रीरंग भोगण.

@कडोलकर गल्ली येथे डॉ. प्रदिप पाटील, डॉ. गजानन पाटील, डॉ. संतोष पाटील.

@नार्वेकर गल्ली येथे डॉ. गावकर, डॉ. भोसले, डॉ. अनगोळकर व महिला डॉक्टरांचे पथक.

@बेननस्मीथ कॉलेज येथे डॉ. मोहन, डॉ. प्रदिप देसाई, डॉ. चोपडे, डॉ. कदम व महिला डॉक्टरांचे पथक.

@धर्मवीर संभाजी चौक येथे डॉ. सुनील भादुंर्गे, डॉ. व्ही. एन. देसाई, डॉ. व्ही. एस. देसाई, डॉ. मिलिंद हलगेकर, डॉ. अनिता भादुर्गे, डॉ. उज्वला हलगेकर व डॉ. बामणे.

मुस्लीम बांधवांतर्फे 22 ठिकाणी स्टॉल्स

क्रांती मोर्चात सहभागी होणाऱया नागरिकांच्या सोईसाठी मुस्लीम समाजातील विविध संघटनांच्या वतीने शहराच्या विविध भागात पाण्याचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.

स्कायझोन, चन्नम्मा सर्कल, बसस्टॉप, धर्मवीर संभाजी चौक, गांधीनगर संकम हॉटेल, किल्ला, शनिवार खूट, नरगुंदकर भावे चौक, मुजावर गल्ली कॉर्नर, महांतेशनगर ब्रीज, आरओबी, रेल्वेस्टेशन, फीश मार्केट, गोवावेस, नाथ पै सर्कल, पॅटसन, शिवाजी गार्डन, रामदेव सर्कल, कोल्हापूर सर्कल, पिरनवाडी क्रॉस, हर्षा शोरूम व आरटीओ सर्कल येथे हे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.

सीबीटी येथे संमता सर्वधर्म समितीचे रफीक देसाई यांच्या वतीने अल्पोहाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती इनायत फरास व खताल गचवाले यांनी दिली आहे.

Related posts: