|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मोर्चामध्ये होणार लाखोंची गर्दी

मोर्चामध्ये होणार लाखोंची गर्दी 

दररोज वाढता पाठिंबाःटी-शर्ट, भगवे ध्वज खरेदीसाठी प्रचंड गर्दी ;सर्व शहर लागले  मोर्चाच्या तयारीला

प्रतिनिधी/ बेळगाव

मराठय़ांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित केलेल्या मराठा क्रांती मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला असून, सोमवारी विविध समाजातील नागरिकांनी व संघटनांनी स्वयंस्फूर्तीने मोर्चाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. स्वकुळ साळी समाज, चेंबर ऑफ कॉमर्स माजी अध्यक्ष फोरम, सिंधी पंचायत भवन यासह विविध संघटनांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र मोर्चाच्या संयोजकांकडे दिले. तसेच ठिकठिकाणी आयोजित केलेल्या बैठकांनाही मोठा प्रतिसाद मिळू लागला असून, मोर्चामध्ये लाखोंची गर्दी होणार आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण शहर मोर्चाच्या तयारीत गुंतल्याचे दिसून येत आहे.

चेंबर ऑफ कॉमर्स माजी फोरमतर्फे माजी अध्यक्ष सतीश तेंडोलकर, बसवराज जवळी व सेवंतीलाल शहा यांनी मोर्चाला जाहीर पाठिंब्याचे पत्रक संयोजकांकडे दिले. यावेळी बोलताना सतीश तेंडोलकर यांनी बेळगावच्या विकासात मराठा समाजाचे योगदान मोलाचे असून, प्रत्येकाने मोर्चामध्ये सामील होऊन मराठा आणि मराठी भाषिक क्रांती मूक मोर्चा यशस्वी करूया. यामधून विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. त्या मागण्या सोडवून घेण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून होईल, असे ते म्हणाले.

सिंधी समाज

येथील सिंधी पंचायत भवन व सिंधी समाजाच्यावतीने मोर्चाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. याबाबतचे पत्रक सोमवारी मोर्चाच्या संयोजकांकडे देण्यात आले. यावेळी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. जास्तीत जास्त संख्येने सिंधी समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

मराठी आवाज बुलंद करण्याचे जुने बेळगाव येथील नागरिकांचे आवाहन 

जुने बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी गुणवंत पाटील, प्रकाश मरगाळे, माजी महापौर आप्पासाहेब पुजारी आदींनी मार्गदर्शन केले. जुने बेळगाव येथील प्रत्येकाने मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होऊन मराठी आवाज बुलंद करावा, असे आवाहनही करण्यात आले.

शांताराम होसूरकर, नारायण खन्नूकर, नितीन खन्नूकर, योगेश पाटील, किर्तीकुमार कुलकर्णी, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, राजू मरवे, अनंत देसाई, नारायण बेनके, यल्लाप्पा देसूरकर, अशोक कणबरकर, मंगल कणबरकर, बाळू खन्नूकर, संतोष शिवनगेकर, मोहन बेनके, सुहास खन्नूकर आदी उपस्थित होते.

माजी सैनिक हजारोंच्या संख्येने सहभागी होणार

माजी सैनिक असोसिएशनची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी सुभेदार मनोहर पाटील, सुभेदार सुधाकर चाळके आदींनी मोर्चासंदर्भात मार्गदर्शन केले. ‘इतकी वर्षे लढलो देशासाठी, आता लढूया मराठीसाठी’ असे सांगत मोर्चाच्या माध्यमातून मराठी भाषिकांच्या समस्या सोडवून घेऊया, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कॅप्टन जोतिबा किवंडे, हवालदार अरुण गावडे, कॅप्टन दामोदर मोटे, अशोक हट्टीकर, अरुण नाईक, नामदेव सावंत, भरत मस्के, गणपत गावडे आदी यावेळी उपस्थित होते.

बाल शिवाजी लाठी मेळा

बसवण कुडची येथील बाल शिवाजी लाठी मेळा यांच्यावतीने मोर्चाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. प्रत्येकाने मोर्चामध्ये शिस्तीने आणि संयमाने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच पाठिंब्याचे पत्र संयोजकांकडे सुपूर्द करण्यात आले.

स्वकुळ साळी समाजाचा जाहीर पाठिंबा

स्वकुळ साळी समाजाच्यावतीने मराठा क्रांती मोर्चाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. स्वकुळ साळी समाजाच्या पाठिंब्याचे पत्र अध्यक्ष सुरेश मोटे यांनी संयोजकांकडे दिले. यावेळी उपाध्यक्ष दिलीप दळवी, अभिजीत तडकोड, भीमराव अमरोळे, शंकर अमरोळे, चंद्रकांत क्षिरसागर, बाळकृष्ण अमरोळे, सुधाकर बडवे, मोहन कांदेकर, लक्ष्मीकांत गंथडे आदी यावेळी उपस्थित होते.

वझे गल्लीचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार

वझे गल्ली येथील पंच मंडळींच्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी यल्लाप्पा नागोजीचे, गणपत बैलूर, दत्ता पवार, प्रभाकर आटीकर, अनंत माळवी आदी यावेळी उपस्थित होते.

मराठा महिला मंडळ

मराठा महिला मंडळाच्यावतीने मोर्चास जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. अध्यक्षा शोभा हारगुडे यांनी मोर्चाच्या माध्यमातून सीमावासियांच्या मागण्या अग्रक्रमाने मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक महिला-युवतींनी मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी नीता पाटील, ज्योती ओऊळकर, सुवर्णा बडवाण्णाचे, शुभांगी केसरकर, प्रतिभा कांगले, जयश्री चंदगडकर, राजश्री अनगोळकर, अंजना शंभूचे आदी उपस्थित होत्या.

जिजाऊ महिला मंडळ, कंग्राळ गल्ली

जिजाऊ महिला मंडळ कंग्राळ गल्लीच्यावतीने मोर्चास जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचा निर्धार मंडळाच्या बैठकीत करण्यात आला. रेणुका कोकितकर, अंजना शंभूचे, उज्ज्वला मोरे, अनिता शंभूचे, सुनीता शंभूचे, राजश्री कंग्राळकर, ज्योती सुतार, सुलोचना शेट्टी, नीलम बडवाण्णाचे, रुक्मिणी अडकूरकर, अंजना साळुंके आदी उपस्थित होत्या.

रोहिदासनगर

रोहिदासनगर रहिवासी संघटनेच्यावतीने मोर्चाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. संघटनेची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपण स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून काम करणार असल्याचे पत्रक संयोजकांना दिले आहे.

विश्वकर्मा पांचाळ मनुमय संस्था

मोर्चामध्ये विश्वकर्मा पांचाळ मनुमय संस्थेच्यावतीने हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  समाजातील सर्व बंधू-भगिनींनी मोर्चात प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भीमसेना युवक मंडळ

कॅम्प येथील भीमसेना युवक मंडळाच्यावतीने आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कॅम्प, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जयहिंद चौक कॅम्प, कॅन्टोन्मेंट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ऍन्थोनी स्ट्रीट, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हाय स्ट्रीट, कॅम्प यांच्यावतीने मोर्चास जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. मंडळाच्या झालेल्या बैठकीत कॅम्प परिसरातून हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार केला आहे.

यावेळी अरविंद तुपेकर, सुभाष चव्हाण, अजय बडोदेकर, शाम चोडणकर,

Related posts: